Goa boy managing millions of dollars in cryptocurrency Dainik Gomantak
अर्थविश्व

गोव्यातील छोट्या गजेशचा Cryptocurrencyत मोठा पराक्रम

गोव्यातील 13 वर्षांच्या मुलाने लाखो डॉलर्स किमतीच्या क्रिप्टोकरन्सी(Cryptocurrency) व्यवस्थापित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म(Digital Platform) तयार तयार केले आहे.

दैनिक गोमन्तक

आपल्या अगदी लहान वयात गोव्याच्या(Goa) एका मुलाने कमाल करून दाखवली आहे. गोव्यातील 13 वर्षांच्या मुलाने लाखो डॉलर्स किमतीच्या क्रिप्टोकरन्सी(Cryptocurrency) व्यवस्थापित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म(Digital Platform) तयार तयार केले आहे. (Goa boy managing millions of dollars in cryptocurrency)

गजेश पणजी येथील पीपल्स हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी, COVID -19 साथीच्या पहिल्या लाटेमुळे देश लॉकडाऊन असताना त्याने ऑनलाइन शैक्षणिक कन्टेन्ट तयार करण्यास सुरुवात केली. गजेशने तयार केलेले कन्टेन्ट स्थानिक शाळांमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी होती कारण कोरोनामुळे शाळा पूर्णपणे बंद झाल्या होत्या.

या वर्षी गजेशने पॉलीगॅज नावाच्या नेटवर्क वर दोन अशे अप्लिकेशन तयार केले ज्यावर क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक करता येऊ शकते.

अहवालानुसार,पॉलीगॅज एक विकेंद्रित वित्त आणि NFT चा इंटरफेस आहे. तर दुसरीकडे,स्थिर नाणे एक्सचेंजची सुविधाही प्रदान करते. चॅटबॉट्स आणि ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानासह, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म पुरवते. गजेश यांनी वयाच्या 8 व्या वर्षी कोडिंगचे कौशल्य शिकण्यास सुरुवात केली असून या वयात त्याला जावा सारख्या अनेक प्रोग्रामिंग लँग्वेज येतात हे नवल.

पॉलीगॅज पॉलीगॉन ब्लॉकचेनवर तयार केले असून , ज्यावर आता क्रिप्टोकरन्सीमध्ये जवळपास 7 दशलक्ष डॉलर कमावलेत आहेत यामध्ये अब्जाधीश मार्क क्यूबन कडून पॉलीगॉन ब्लॉकचेन मधील अलीकडील गुंतवणुकीचा देखील समावेश आहे.

"गेल्या एक वर्षापासून, जेव्हा कोरोनामुळे शाळा बंद झाल्या होत्या , तेव्हा मी काही ऑनलाइन अभ्यासक्रम घेण्याचा आणि पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, ज्यात बफेलो, न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीचे विद्यापीठ देखील होते," असे गजेशने सांगितले आहे .

त्याने फक्त आठ वर्षांचा असताना बूट कॅम्पमध्ये कोडिंग शिकण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून, त्याने C, C ++, Java, JavaScript आणि Solidity यासारख्या कोडिंग भाषांवर प्रभुत्व मिळवले आहे.

2018 मध्ये, गजेशने गोव्यातील आंतरराष्ट्रीय ब्लॉकचेनच्या व्याख्यानांना हजेरी लावली ज्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये त्यांची आवड निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT