आता JIOची कार, MG मोटर्स सोबत भागीदारी

देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक एमजी मोटर इंडियाने(MG Motors) आज डिजिटल सेवा प्रदाता जिओ(JIO) इंडिया सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
Partnership between JIO and MG Motors For IOT
Partnership between JIO and MG Motors For IOTDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक एमजी मोटर इंडियाने(MG Motors) आज डिजिटल सेवा प्रदाता जिओ(JIO) इंडिया सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.एमजी मोटर्सने ही भागीदारी आपल्या आगामी एसयूव्हीसाठी(SUV Car) केली असून ज्यात जिओचे आयओटी(IOT) सोल्यूशन वापरण्यात येणार आहे. एमजी हेक्टर(MG Hector) आणि झेडएस ईव्ही सारख्या कार विकणारी कंपनी आपल्या आगामी मॉडेलमध्ये जिओच्या आयओटी सोल्यूशनद्वारे सक्षम आयटी प्रणाली वापरणार आहेत. (Partnership between JIO and MG Motors For IOT)

या भागीदारीवर आपले मत मांडताना कंपनीने म्हटले आहे की, यामुळे जिओच्या 4 जी नेटवर्कमुळे दुर्गम भागातही एमजी मोटर्सच्या आगामी एसयूव्ही हाय-स्पीड इन-कार कनेक्टिव्हिटी ग्राहकांना मिळेल तसेच एमजीच्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या ग्राहकांना जिओच्या व्यापक इंटरनेट वापराचा लाभ घेता येईल आणि केवळ महानगरांमध्येच नव्हे तर छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही उच्च-गुणवत्तेच्या कनेक्टिव्हिटीचा ग्राहकांना लाभ मिळणार आहे.

जिओचे हे नवीन कनेक्टेड व्हेईकल सोल्यूशन हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीचे एकत्रीकरण असणार आहे जे वापरकर्त्यांना ट्रेंडिंग इन्फोटेनमेंट आणि रिअल-टाइम टेलिमॅटिक्समध्ये वाहनांना सक्षम करते.

Partnership between JIO and MG Motors For IOT
Ola Electric Scooter लवकरच बाजारात येणार! कंपनीने शोधला 'हा' मुहूर्त

जिओचे संचालक आणि अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले की, जिओने भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उत्पादने आणि उपाययोजनांची इकोसिस्टम तयार केली आहे. एमजी मोटर इंडियासोबत आमची भागीदारी ही या प्रवासातील पुढची महत्त्वाची पायरी असून जिओचे ई-सिम, आयओटी आणि स्ट्रीमिंग सोल्युशन्स एमजी वापरकर्त्यांना रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्स सेवा प्रदान करतील.

एमजी मोटर्सची आगामी मध्यम आकाराची एसयूव्ही या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतीय बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com