Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2022: ट्रॅव्हल अन् टुरिझम उद्योगाला मोदी सरकार देणार का दिलासा?

कोरोनाचा सर्वात मोठा फटका ट्रॅव्हल आणि टुरिझम उद्योगाला बसला आहे. त्यामुळेच आगामी ट्रांसपोर्टेशन उद्योगाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोनाचा सर्वात मोठा फटका ट्रॅव्हल (Travel) आणि टुरिझम (Tourism) उद्योगाला बसला आहे. त्यामुळेच आगामी ट्रांसपोर्टेशन उद्योगाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) मोठ्या घोषणा करू शकतात, अशी उद्योग जगताची अपेक्षा आहे. लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस (LTA) सूट मर्यादा वाढवावी असे MakeMyTrip, ixigo आणि Thomas CooK सारख्या इंडस्ट्रीमधील लोकांचे म्हणणे समोर आहे.

एलटीए सूट मर्यादा वाढवण्याबरोबरच, सरकारने करदात्यांच्या (taxpayers) वार्षिक भत्त्यांच्या (yearly allounce) लिस्टमध्ये आणण्याचा विचार केला पाहिजे. सध्या, करदाता 2 वर्षांतून एकदा तर 4 वर्षांत 2 वेळा रजेच्या प्रवास (leave travel) सूटसाठी अर्ज करू शकतो. त्यांना वार्षिक आधारावर या सूटचा क्लेम करण्याची सुविधा मिळावी असे MakeMyTrip चे राजेश मागो म्हटले आहेत.

Online Shopping: तुम्हाला क्रेडिट कार्डचे 'हे' सर्वोत्तम प्रकार माहिती आहेत का?देशांतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवासाला चालना देण्यासाठी सरकार एक लाँग टर्म योजना आणणार अशी शक्यता असल्याचे ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल ixigo's चे संस्थापक आलोक बाजपेयी म्हणाले आहेत. शिवाय देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी तरतुदी पाहिल्या पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले.

देशांतर्गत प्रवास आणि पर्यटनावर होणाऱ्या खर्चासाठी आयकर डिडक्शन मिळाले तर आणखी फायदा होऊ शकतो असेही ते म्हणाले. याशिवाय, एअरलाइन्स सेक्टरसाठी कर सूट मिळाली तर चांगली रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. हवाई इंधन जीएसटीच्या कक्षेत आणल्याने विमान वाहतूक क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.

गेल्या वर्षी पर्यटन मंत्रालयासाठी 2020-21 मध्ये 2500 कोटी रुपयांची तरतूद कमी करून 2026.77 कोटी रुपये करण्यात आली, जी उद्योगांसाठी (Industry) मोठा धक्का बसवणारी बाब होता आणि आता ही तरतूद वाढवावी अशी मागणीही जोर धरत आहे. भारतीय टूर ऑपरेटर्सद्वारे विकल्या जाणाऱ्या परदेशी हॉलिडे पॅकेजवर लागणारा 5 टक्के टॅक्स अ‍ॅट सोर्स (TCS) मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT