Online Shopping: तुम्हाला क्रेडिट कार्डचे 'हे' सर्वोत्तम प्रकार माहिती आहेत का?

क्रेडिट कार्डवर Amazon Prime सदस्यांना सुमारे 5 टक्के कॅशबँकची सुविधा देण्यात आली आहे.
Credit  Card
Credit Card Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढले आहे. यामुळे अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापरही अधिक वाढला आहे. अनेक बँका (Bank) आणि कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देत असतात. अनेकजण शॉपिंग (Shopping) करताना क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करतात. याशिवाय मॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये (Hotel) , थेटरमध्ये यासारख्या अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक फायदे मिळवू शकतात.

पण कोणते क्रेडिट कार्ड (Credit Card) सर्वोत्तम आहे हे अनेक वेळा आपल्याला काळात नाही. प्रत्येक क्रेडिटकार्ड ग्राहकाच्या गरजेनुसार असते. म्हणूनच क्रेडिट कार्डचे वैशिट्ये समजून घेऊन तुम्ही ते निवडले पाहिजे. कारण याचा फायदा तुम्हालाच होईल. तुमचे काम सोपे करण्यासाठी पैशाबाजारने आपल्या संशोधनात 5 सर्वोत्तम एन्ट्री लेव्हल कार्डची माहिती दिली आहे. हे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही विविध कॅशबॅक ऑफर आणि बक्षिसे मिळवू शकता. चाल तर मग जाणून घेऊया अशा क्रेडिट कार्डबद्दल अधिक माहिती.

* ICICI बँक Amazon Prime क्रेडिट कार्ड:

आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड अॅमेझॉन प्राईम सदस्यांसाठी एक खास क्रेडिट कार्ड घेऊन आले आहे.ज्यात अॅमेझॉन प्राईम सदस्यांना सुमारे 5 टक्के कॅशबॅक ऑफरची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर नॉन-प्राईम सदस्यांना 3 टक्के कॅशबॅकची (cashback) सुविधा देण्यात आली आहे. जर तुम्ही या क्रेडिट कार्डद्वारे फ्लाईट बुकिंग, रिचार्ज, बिल पेमेंट आणि गिफ्ट कार्ड इत्यादीसाठी बिल ऑनलाईन (Online) दिले असेल तर 1 टक्के कॅशबॅक सुविधा दिली जाईल. हे क्रेडिट कार्ड लाईफ टाइम फ्री कार्ड आहे.

Credit  Card
Budget: तुम्हाला माहितीयेत का 'या' 5 बड्या अर्थसंकल्पातील त्रुटी!

* एसबीआय क्रेडिट कार्ड

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने (SBI) देखील आपल्या ग्राहकांसाठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. त्याचे नाव SBI SimplyCLICK क्रेडिट कार्ड आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्डची सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही bookMyShow, Lenskart, Amazon, Cleartrip यासारख्या कंपन्यांसोबत खरेदी करतांना अनके ऑफर्सचा लाभ घेऊ शकता . हे कार्ड तुम्हाला 5x रिवॉर्ड आणि इंधन खरेदीवर 1 टक्क्यापर्यंत रिवॉर्ड देतो. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे..

अॅक्सिस बँक

फ्लिपकार्डवर अनेक लोक शॉपिंग करतात. फ्लिपकार्डने आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डचा पर्याय आणला आहे. या कार्डद्वारे तुम्ही फ्लिपकार्डवर शॉपिंग करताना तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या कॅशबॅकसाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला या कार्डद्वारे पेमेंट केल्यास PVR, Curefit, Uber आणि Tata Sky पेमेंटवर 4 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com