Budget 2022: रेल्वेसाठीचा अर्थसंकल्प कधी अन् का बंद झाला ?

रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास खूप रंजक आहे, तर काही रेल्वे मंत्र्यांची भाषणं आजही चर्चेचा विषय ठरतात.
Budget 2022
Budget 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोनाची स्थिती आणि त्यामुळे अर्थचक्रावर झालेला परिणाम, आता यंदाचा अर्थसंकल्प नेमका कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. दरम्यान, काही वर्षांपर्यंत देशात वेगळा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा होती. मात्र, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकार सत्तेत आल्यानंतर वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा संपुष्टात आली. रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास खूप रंजक आहे. तर काही रेल्वे मंत्र्यांची भाषणं आजही चर्चेचा विषय आहेत.

Budget 2022
Online Shopping: तुम्हाला क्रेडिट कार्डचे 'हे' सर्वोत्तम प्रकार माहिती आहेत का?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 21 सप्टेंबर 2016 रोजी रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली गेली होती. त्यामुळे वेगळा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्याची 92 वर्षांची प्रथा खंडीत झाली होती. तत्पूर्वी सुरेश प्रभू यांनी शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले, त्याचवेळी त्यांनी देशाच्या व्यापक हितासाठी विलीनीकरण केल्याचे सांगितले होते.

देशात जवळपास 92 वर्षांपर्यंत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे अर्थसंकल्पात सादर करण्यात येत होता. पण, अखेर तो वेगळा सादर करणे शेवटी बंद करण्यात आले, आणि देशाच्या अर्थसंकल्पातच (Indian Budget) त्याचा समावेश करण्यात आला. ब्रिटिशांच्या काळात, 1924 मध्ये ब्रिटिश अर्थतज्ञ विल्यम ऍकवर्थ यांची समिती रेल्वेच्या कामकाजाबाबत 1920-21 मध्ये नेमण्यात आली होती. ऍकवर्थ समितीने रेल्वेच्या कारभाराच्या आणि प्रशासकीय जबाबदारीच्या फेररचनेसह स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर करण्याची देखील शिफारस केली होती. त्यानंतर 1924 मध्ये पहिले स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर केले.

Budget 2022
Budget 2022: यावेळच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय असू शकते विशेष?

स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे अंदाजपत्रक जॉन मथाई यांनी नोव्हेंबर 1947 मध्ये सादर केले होते. तर सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वेचे शेवटचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. देशाच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, 2016 मध्ये रेल्वे अंदाजपत्रक अर्थसंकल्पात समाविष्ट करून, एकत्रित अर्थसंकल्प सादर केला गेला होता.

2004 ते मे 2009 या कालावधीत लालूप्रसाद यादव यांनी सलग सहा वेळा रेल्वे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यांच्या काळातच 2009 मध्ये 108 अब्ज रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. 2000 मध्ये रेल्वे अंदाजपत्रक सादर करणाऱ्या ममता बॅनर्जी पहिल्या महिला रेल्वेमंत्री ठरल्या. 2002 मध्ये दोन वेगवेगळ्या आघाड्यांच्या वतीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए आणि संयुक्त पुरोगामी आघाडी-यूपीए अंदाजपत्रक सादर करणाऱ्याही त्या पहिल्या महिला रेल्वेअर्थमंत्री ठरल्या होत्या.

रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी पहिल्यांदा 2014 च्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनची (Bullet Train) घोषणा केली होती, तसेच नऊ हायस्पीड रेल्वेही (High Speed Railway) सुरू करण्यात आल्या होत्या. रेल्वे अंदाजपत्रकाचे पहिले दूरचित्रवाणी प्रक्षेपण 24 मार्च 1994 रोजी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com