Vande Bharat  Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat: वंदे भारत ट्रेनची मोहिनी! गडी सेल्फी घ्यायला गेला अन्..., Video viral

Man Locked In Vande Bharat: वंदे भारत ट्रेन लोकांना मोहिनी घालत आहे. आलिशान सुविधांसाठी लोक त्यातून प्रवास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Man Locked In Vande Bharat: वंदे भारत ट्रेन लोकांना मोहिनी घालत आहे. आलिशान सुविधांसाठी लोक त्यातून प्रवास करत आहेत. परंतु नुकतेच एका व्यक्तीसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हा व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी ट्रेनमध्ये चढला, मात्र ट्रेनमध्ये चढताच दरवाजा बंद झाला. ट्रेन सुरु झाली आणि तो तिथून 200 किलोमीटरवर पोहोचला.

आंध्र प्रदेशातील राजमुंद्री स्टेशन

वास्तविक, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) राजमुंद्री स्टेशनची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत ट्रेन जेव्हा राजमुंद्री स्टेशनवर आली तेव्हा एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी चढला, परंतु पुढच्याच क्षणी ट्रेन पुढे जाऊ लागली आणि ट्रेनचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला. यानंतर दरवाजा उघडता न आल्याने त्या व्यक्तीची तारांबळ उडाली.

दार उघडण्याचा प्रयत्न केला

व्हिडिओमध्ये ती व्यक्ती आत कैद झाल्याचे दिसत आहे. यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उघडला नाही. त्यानंतर त्याने तिथे उपस्थित टीटीईला सगळा घटनाक्रम सांगितला. त्यावर टीटीईने सांगितले की, आता पुढील स्टेशन विजयवाडा येथे उतरावे लागेल. त्यानंतर तो सुमारे दोनशे किलोमीटर दूर असलेल्या विशाखापट्टणमला (Visakhapatnam) गेला आणि तिथून कसा तरी परतला.

विशाखापट्टणमचे भाडे

रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की, टीटीईने त्याच्याकडून विशाखापट्टणम पर्यंतचे भाडे घेतले आणि तिथे तो व्यक्ती ट्रेनमधून उतरला. अलीकडेच 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आठव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम दरम्यान धावत आहे. दुसऱ्याच दिवशी त्याच ट्रेनमध्ये ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT