कर्ज फेडण्यासाठी व कर्जाचे नियोजन करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो Dainik Gomantak
अर्थविश्व

कर्ज फेडण्यासाठी व पैशाचे नियोजन करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

कर्ज ही वाईट गोष्ट नसून तुम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकता.

दैनिक गोमन्तक

अलीकडेच झालेल्या एका उद्योग सर्वेक्षणात असे दिसून आले की फ्रीज, टीव्ही आणि मोबईल यासरखी वस्तूंची खरेदी करण्यासाठी जवळपास निम्मे भारतीय कर्ज घेत आहेत. त्यामुळे कर्ज ही एक विशिष्ट आर्थिक स्थिती नाही आणि त्याकडे नेहमी नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये तर ते तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास मदत करू शकते. यामुळे कर्जाचे नीट व्यवस्थापण करण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

* तुमच्या कर्जाचे नियोजन करा

जीवनातील अनेक गोष्टी सुव्यवस्थित करण्यासाठी संघटित करणे ही गुरुकिल्ली आहे आणि जेव्हा आर्थिक बाबींचा विचार केला जातो तेव्हा देखील ही गोष्ट महत्वाची ठरते. कार्यकाळ आणि व्याजदाराच्या माहितीसह तुमकजहया सर्व कर्जाची यादी तयार करावी. यामुळे तुम्हाला कोणती कर्जे सर्वात तातडीने भरायची आहेत हे समजेल. एकदा अशी यादी तयार केल्यावर, ते देयकाना प्राधान्य देण्यास मदत करू शकते आणि अंतिम मुदती आणि दंड शुल्क टळू शकते.

* वेळेवर बिले भरणे

कर्जाचे व्यवस्थापन करतांना वेळेवर बिले भरणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्यावेळी तुमचे मासिक उत्पन्न होते तेव्हाच सर्व बिल वेळेवर भरून टाकावे, युटीलिटी, क्रेडिट किंवा कर्ज असोत ते आधी बंद करावे. यामुळे तुम्हाला बचत , गुंतवणूक आणि इतर गोष्टीसाठी बाजूला ठेवाव्या लागणाऱ्या वास्तविक रकमेचे चांगले नियोजन करता येईल.

* पैसाचे नियोजन करावे

पैशाचे नियोजन करतांना तुम्ही या दोन पर्यायांचा वापर करू शकता. एक म्हणजे सर्वात जास्त व्याजदराने कर्ज फेडू शकता आणि नंतर दीर्घकाळासाठी पैशाची बचत करू शकता. दुसरे म्हणजे पैशाची कमी गुंतवणूक करून कालांतराने त्याचा लाभ घ्यावा. महत्वाची गोष्ट म्हणजे यातील एक पर्याय निवडा आणि त्यावर टिकून रहा.

* तात्काळ पैशाची गरज

अनेक वेळा आपल्याला पैशांची बचत करण्याचा सल्ला दिला जातो. पण कधी अशी परिस्थिति येते की तेथे तत्काळ निधिची गरज पडते. तेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत असले पाहिजे. यासाठी तुमच्या मासिक उत्पन्नातील काही रक्कम जतन करून ठेवावी. ही रक्कम अशा वेळी कामी पडेल.

* कर्जासह तुमचे कर्ज एकत्र करा

वेगवेगळ्या मुदती आणि व्याजदरासह अनेक कर्जाच्या बाबतीत, ते कमी व्याजासह एकाच कर्जामध्ये एकत्रित करणे शक्य आहे. असे करणे एका सर्वसमावेशक पेमेंट स्ट्रॅटेजीमध्ये एकाधिक पेमेंट आणि डेडलाइन सुव्यवस्थित करण्यात मदत करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT