Work From Home बस्स! आता कामावर परत या, TCS च्या कर्मचाऱ्यांना सूचना

कंपनी यासाठी 25/25 मॉडेल राबवणार आहे ज्यात कंपनी 2025 पर्यंत कोणत्याही वेळी 25% पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातून काम करू नयेत असा प्रयत्न करेल
TCS asks employees to get back to office from work from home
TCS asks employees to get back to office from work from home Dainik Gomantak

TCS ने कर्मचार्‍यांना या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या ऑफिसमध्ये कामावर परत येण्यास सांगितले आहे, TCS ने जवळजवळ दोन वर्षांचे वर्कफ्रॉम-होम (Work From Home) धोरण अधिकृतपणे संपुष्टात आणले आहे जे COVID-19 मुळे स्वीकारावे लागले होते. त्याचबरोबर जे त्यांच्या गावी काम करत आहेत त्यांना देखील आधीच त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत येण्यास सांगण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या काळात लॉकडॉउन लागल्याने मोठ्या कंपन्यातील IT कर्मचारी हे आपल्या मूळ गावी जाऊन वर्कफ्रॉम-होम करत होते. (TCS asks employees to get back to office from work from home)

“सध्या, आमचे फक्त 5% सहकारी कार्यालयातून काम करतात. तर या वर्षाच्या अखेरीस, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना 25/25 मॉडेलवर जाण्यापूर्वी, कमीतकमी सुरुवातीला, कार्यालयात परत येण्यासाठी प्रोत्साहित करू. कार्यालयात परतणे हे कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कॅलिब्रेट केलेले पाऊल असेल,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

25/25 मॉडेल हे असे आहे जिथे कंपनी 2025 पर्यंत कोणत्याही वेळी 25% पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातून काम करू नयेत असा प्रयत्न करेल. “आम्ही 25/25 मॉडेलसाठी वचनबद्ध आहोत परंतु,हे लागू करण्यापूर्वी, आम्ही लोकांना कार्यालयात परत आणून सुरुवात करणे आवश्यक आहे आणि हळूहळू 25/25 ही पद्धत विकसित होणे आवश्यक असल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे., TCS मध्ये सध्या 5 लाख कर्मचारी आहेत.

TCS asks employees to get back to office from work from home
केंद्र सरकारकडून राज्यांना 95082 कोटी रुपयांचं गिफ्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com