FM Nirmala Sitharaman | Income Tax Notice | Income Tax Returns Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax भरणाऱ्यांची चांदी, आता एवढी मिळणार कर सवलत; अर्थमंत्री करणार घोषणा!

Income Tax Change: अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्र सरकार इन्कम टॅक्सबाबत नियोजन करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प 2023 सादर करतील.

दैनिक गोमन्तक

FM Nirmala Sitharaman: अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्र सरकार इन्कम टॅक्सबाबत नियोजन करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प 2023 सादर करतील. यावर्षी करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. टॅक्स संदर्भात मोठे बदल करण्याची योजना सरकारकडून आखली जात आहे. तुम्हीही कर भरत असाल किंवा टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर केंद्र सरकार यावेळी टॅक्स दरांमध्ये कोणते बदल करणार आहे, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

तज्ञांचे मत काय आहे?

तज्ञांच्या मतानुसार, सरकार (Government) अनेक प्रकारे टॅक्स स्लॅबमध्ये बदल करु शकते. त्याचवेळी, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, आयकराचे दर आणि स्लॅब लागू राहतील जे मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये लागू केले गेले.

कोणत्या प्रकारची कर सूट मिळेल?

सध्या देशात 2 प्रकारची कर व्यवस्था लागू आहे. नवीन प्रणालीनुसार कर भरायचा की जुन्या प्रणालीनुसार… पण यावेळेस सरकार सर्वसामान्यांना कोणती कर सवलत देणार आहे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.

Income Tax Slabs and Rates 2023 (New Regime)

2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर

>> 2.5-5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 5% कर

>> 5-7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 10% कर

>> 7.50-10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 15% कर

>> 10-12.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 20% कर

>> 12.5-15 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 25% कर

>> 15-20 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 30% कर

>> 20 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर - 30% कर

Income Tax Slabs and Rates 2023 (Old Regime)

>> 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - शून्य कर

>> 2.5-5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 5% कर

>> 5-10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 20% कर

>> 10-20 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर - 30% कर

>> 20 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर - 30% कर

30 टक्के दर 25 टक्के केला जाईल

दरवर्षी आयकरदात्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारकडून बजेटमध्ये काही विशेष तरतुदी केल्या जातात. यावेळी सरकार आयकर दरांमध्ये (Income Tax) मोठी सुधारणा करण्याचा विचार करत असून, त्यानंतर करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे मानले जाते की, सरकार कमाल 30 टक्के दर 25 टक्के कमी करु शकते आणि कमाल कर मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

Goa health Camp: 14 महिलांमध्ये 'बेनाइन' स्तनगाठी; 163 नागरिकांची तपासणी, धारबांदोडा येथे कर्करोग निदान शिबिर

Kosambi: कोसंबी आणि आजची शिक्षणपद्धती

SCROLL FOR NEXT