Flipkart UPI 
अर्थविश्व

Flipkart UPI: फोन पे, गूगल पे ला आता फ्लिपकार्टची टक्कर, लाँच केले UPI App

Flipkart UPI App Launch: तुम्ही QR कोड स्कॅन करून फ्लिपकार्टद्वारे सहजपणे पेमेंट करू शकाल. Flipkart UPI च्या माध्यमातून तुम्ही कोणतेही बिल, मोबाईल रिचार्ज यांसारख्या गोष्टी करू शकता.

Ashutosh Masgaunde

Flipkart Launches Its Own UPI App:

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने आपल्या भारतीय ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता भारतात आपली UPI सेवा सुरू केली आहे. याचा अर्थ आता तुम्ही इतर UPI प्रमाणेच ऑनलाइन पेमेंटसाठी फ्लिपकार्टचा वापर करू शकाल.

Flipkart ला UPI सेवा सुरू केल्यानंतर, Google Pay, Paytm, PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मला कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

आता तुम्हाला कुठेही ऑनलाइन पेमेंट करायचे असल्यास, तुम्ही QR कोड स्कॅन करून फ्लिपकार्टद्वारे सहजपणे पेमेंट करू शकाल. Flipkart UPI च्या माध्यमातून तुम्ही कोणतेही बिल, मोबाईल रिचार्ज यांसारख्या गोष्टी करू शकता.

भारतातील पेटीएम पेमेंट बँक अनेक समस्यांना तोंड देत असताना फ्लिपकार्टची UPI सेवा सुरू झाली आहे. पेटीएमच्या या कठीण काळलात फ्लिपकार्टच्या UPI सेवेचा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे.

UPI सेवा सुरू करण्यासाठी फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. फ्लिपकार्टने आपली UPI सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू केली आहे.

असे वापरा Flipkart UPI

  • Flipkart UPI वापरण्यासाठी, प्रथम ॲप ओपन करा.

  • आता तुम्हाला होम पेजवर 'Scan & Pay' चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

  • पुढील स्टेपमध्ये तुम्हाला MY UPI च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • आता तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव निवडण्यास सांगितले जाईल.

  • तुम्हाला तुमचा बँक तपशील भरावा लागेल.

  • तपशील भरल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल, एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुमचा Flipkart UPI सक्रिय होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय...', महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेत्यानं शेअर केला Video

IND vs ENG 4th Test: इंग्लंडमध्ये जस्सी बनणार किंग! 'हॅटट्रिक'सह बुमराह रचणार नवा रेकॉर्ड; दिग्गजाला सोडणार मागे

गॅटविक ते गोवा Air India ची फ्लाईट सुरु करण्यासाठी CM सावंत केंद्राशी चर्चा करणार; अहमदाबाद अपघातापासून बंद आहे सेवा

Type 2 Diabetes: महिलांनो सावधान! टाईप 2 मधुमेह वाढवतोय हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय आणि तज्ञांचा सल्ला

Goa Tourist Attack: गोव्यात चाललंय काय? साधू बाबाचा पर्यटकांवर हल्ला, धबधब्यावर फिरणाऱ्यांना दगड-काठीनं केली मारहाण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT