FICCI Frames 2024 चे वेळापत्रक जाहीर, दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार यंदाचा सोहळा

Rani Mukherjee: काही मोजक्या तारकांनी सजलेल्या या कार्यक्रमात, तुर्कीची सुपरस्टार हांडे एर्सेल आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी देखील उपस्थित राहणार आहेत.
FICCI Frames 2024
FICCI Frames 2024
Published on
Updated on

FICCI Frames 2024 Schedule:

24 वी FICCI फ्रेम्स 5 ते 7 मार्च 2024 दरम्यान मुंबईतील द वेस्टिन, पवई लेक येथे होणार आहे. राणी मुखर्जी आणि तुर्की अभिनेत्री हांडे अर्सेल यांच्यासह मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. याद्वारे देशातील उद्योग व्यावसायिकांसाठी असंख्य संधी उपलब्ध करून देण्याचा फिक्कीचा मानस आहे.

हा अत्यंत कार्यक्रम आशियातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचे शिखर मानला जातो, जो जगभरातील उद्योग व्यावसायिकांना आकर्षित करतो.

FICCI फ्रेम्स 2024 हा एक असा कार्यक्रम ठरेल, जो मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्जनशीलता आणि व्यवसाय यांच्यातील बिंदू शोधण्यासाठी दिग्गजांना एकत्र आणेल.

FICCI Frames 2024
New Government Rules: अडचणी टाळण्यासाठी जाणून घ्या, पेटीएम पेमेंट्स बँक, फास्टॅग आणि जीएसटीच्या नियमांतील बदल

FICCI चे सरचिटणीस एस के पाठक आणि FICCI मीडिया आणि मनोरंजन समितीचे अध्यक्ष, केविन वाझ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

काही मोजक्या तारकांनी सजलेल्या या कार्यक्रमात, तुर्कीची सुपरस्टार हांडे एर्सेल आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी, तुर्की हार्टथ्रोब बुराक डेनिझ यांनी या कार्यक्रमात त्यांच्या देखाव्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

FICCI Frames 2024
Anant Ambani: अंबानीच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे तीन खान एकत्र थिरकले; चाहते म्हणाले- 'शाहरुख...'

FICCI फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात FICCI-EY अहवालाचे प्रकाशन होणार आहे. यामध्ये एक व्यापक रोडमॅप असेल, जो भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतागुंत आणि संधी शोधण्यास मदत करेल.

FICCI फ्रेम्स 2024 ची थीम 'RRR: रिफ्लेक्शन्स, रिॲलिटीज आणि रोड अहेड' आहे. थीम माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपवर आकर्षक चर्चेसाठी व्यासपीठी उपलब्ध करून देईल.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे अर्जुन नोहवार, पीव्हीआर आयनॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली, धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता आणि आघाडीच्या चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांच्यासह नामवंत उद्योगपती आणि व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com