Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

निर्मला सीतारामन 15 ऑक्टोबरपासून 'या' फायनेशियल इंक्लूजन कॅपेनचा करणार शुभारंभ

वित्त मंत्रालय 15 ऑक्टोबरपासून विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबवणार आहे.

दैनिक गोमन्तक

वित्त मंत्रालय 15 ऑक्टोबरपासून विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबवणार आहे. ही मोहीम चालवली जाईल जेणेकरून बँक खात्यांची समाधानकारक पातळी गाठता येईल आणि किसान क्रेडिट कार्ड कव्हरेज वाढवता येईल जेणेकरून अधिकाधिक शेतकर्‍यांना त्या अंतर्गत समाविष्ट करता येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक समावेशन मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. 

ही मोहीम 15 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत चालणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्विट केले आहे. यामध्ये, सध्याची खाती मोबाइल (Mobile) आणि आधार क्रमांकाशी जोडण्यावर आणि 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या' किंवा केवायसीची (KYC) संपूर्ण प्रक्रिया करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक समावेशन मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँका (Bank) आणि इतर संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल.

ट्विटमध्ये (Twitte) पुढे म्हटले की, वित्त मंत्रालय 15 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2022 दरम्यान आर्थिक समावेशाची प्रक्रिया पुढे नेत एक विशेष मोहीम आयोजित करेल. भारतातील कटक (ओडिशा), औरंगाबाद (महाराष्ट्र), पुणे (महाराष्ट्र), काकीनाडा (आंध्र प्रदेश), कौशांबी (उत्तर प्रदेश), दतिया (मध्य प्रदेश) आणि बारपेटा (आसाम) या सहा जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर याची सुरुवात झाली.

वित्त मंत्रालयाच्या या मोहिमेत पात्र लोकांसाठी बँक खाती, विमा किंवा पेन्शन योजना यांची समाधानकारक पातळी गाठण्यावर भर दिला जाईल. यासोबतच आधार लिंक केलेल्या खात्यांच्या विस्तारावरही लक्ष केंद्रित केले जाईल. बँका तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक समावेशकतेखाली आणण्याच्या योजनांमध्ये पुढे कसे जायचे यावरही चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT