भारतातील तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या रॉयल एनफिल्डची सप्टेंबरमध्ये विक्रमी विक्री झाली आहे. सप्टेंबरमध्ये बुलेटची विक्री वाढून 82,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. शनिवारी बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने याबाबत माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात त्यांची विक्री गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रॉयल एनफिल्डने 33,529 युनिट्सची विक्री केली होती.
सप्टेंबरमध्ये देशांतर्गत बाजारात बुलेटची विक्री 73,646 युनिट्सपर्यंत वाढली. सप्टेंबर 2021 मध्ये बुलेटची विक्री 27,233 युनिट्सवर होती. त्याचप्रमाणे 1 वर्षापूर्वीच्या तुलनेत बुलेटच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात रॉयल एनफिल्डच्या 8,451 युनिट्सची निर्यात झाली होती, तर वर्षभरापूर्वी याच काळात 6,300 युनिट्सची निर्यात करण्यात आली होती.
देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp बद्दल बोलायचे तर सप्टेंबरमध्ये हिरोची विक्री 2 टक्क्यांनी कमी झाली आहे. हिरो कंपनीने सप्टेंबर महिन्यात 5.30 लाख युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सुमारे 2 टक्के कमी आहे. Hero Moto Corp ची देशांतर्गत विक्री 5.076 लाख युनिट्स आहे, सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने 5.05 लाख युनिट्सची विक्री केली.
हिरोच्या निर्यातीबद्दल बोलायचे तर, सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने 12,300 युनिट्सची निर्यात केली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने सुमारे 25 हजार युनिट्सची निर्यात केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.