FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Consumer Inflation: महागाई दर वाढूनही अर्थ मंत्रालयाने दिली खूशखबर; लवकरच होणार...

Inflation Rate: मागील काही महिन्यांपासून महागाईच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत असताना, अर्थ मंत्रालयाकडून एक निवेदन आले आहे.

Manish Jadhav

Inflation Rate: मागील काही महिन्यांपासून महागाईच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत असताना, अर्थ मंत्रालयाकडून एक निवेदन आले आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर तात्पुरता राहण्याची शक्यता आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याचे कारण आगामी काळात सरकारच्या सावधगिरीच्या पावलांमुळे भाव नियंत्रणात राहतील. तथापि, जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे (Domestic Disturbance) येत्या काही महिन्यांत महागाईचा दबाव वाढू शकतो.

महागाई 15 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर

मंत्रालयाने जुलैमध्ये जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात असे म्हटले होते की, देशांतर्गत वापर आणि गुंतवणुकीच्या (Investment) मागणीत वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षात सरकारने भांडवली खर्चासाठी केलेल्या वाढीव तरतुदीमुळे खाजगी गुंतवणूक वाढत आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई जुलै 2023 मध्ये 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.

किमतीचा दबाव लवकरच कमी होण्याची शक्यता आहे

तथापि, मुख्य चलनवाढ 4.9 टक्क्यांच्या 39 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिली. मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, तृणधान्ये, कडधान्ये आणि भाज्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जुलैमध्ये दुहेरी अंकी वाढ झाली आहे.

देशांतर्गत उत्पादनात व्यत्यय आल्याने महागाईवरही दबाव वाढला. मासिक आर्थिक आढाव्यानुसार, सरकारने (Government) चलनवाढ नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

दुसरीकडे, खाद्यपदार्थांच्या किमतीचा दबाव तात्पुरता असेल अशी अपेक्षा आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, टोमॅटो, हिरवी मिरची, आले आणि लसूण यांसारख्या वस्तूंच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे, काही विशिष्ट वस्तूंच्या किमतींमध्ये असामान्य वाढ झाल्यामुळे जुलै 2023 मध्ये अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT