Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

Nirmala Sitharaman On Inflation: अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी...

Inflation Rate: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
Published on

Inflation Rate: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांत रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर महागाईत थोडी नरमाई आली आहे. मात्र, ती अजूनही सरकारच्या समाधानकारक आकड्यापेक्षा वरच आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'मोदी सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्षम आहे.'

जानेवारीपासून महागाईचा दर 6 टक्क्यांच्या वर राहिली

अन्नधान्याच्या किमतींवरील पुरवठा-बाजूच्या दबावाला तोंड देण्यासाठी 'सुव्यवस्थित यंत्रणे'मुळे भारत महागाईचा अधिक चांगल्या पद्धतीने सामना करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वर्षी जानेवारीपासून किरकोळ चलनवाढीचा दर सातत्याने 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. ही पातळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सहा टक्के समाधानकारक पातळीपेक्षा जास्त आहे.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांची घोषणा, मोदी सरकारच्या आठ वर्षात दोन लाख कोटींची बचत!

भारत महागाईचा सामना करु शकेल

'रॉयटर्स नेक्स्ट' या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना सीतारामन म्हणाल्या की, 'भारत महागाईचा (Inflation) अधिक चांगल्या पद्धतीने सामना करु शकेल. रिझव्‍‌र्ह बँकेकडून महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीस किंवा मध्यात ती सामान्य पातळीवर येईल.' पुढे, सितारामन यांनी मान्य केले की, महागाईवर बाह्य घटकांचा प्रभाव कायम राहणार आहे, परंतु इतर देशांच्या तुलनेत खाद्य उत्पादने आणि ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत भारत 'चांगल्या' स्थितीत आहे.

Nirmala Sitharaman
FM Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री घेणार हा मोठा निर्णय, सर्वसामान्यांचे बल्ले-बल्ले!

चलनवाढ भविष्यात अस्थिर राहील

सीतारामन पुढे म्हणाल्या की, 'मला वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षित आहे.' कच्च्या तेलासारख्या वस्तूंच्या आयातीमुळे महागाईतील चढ-उतार यापुढेही कायम राहू शकतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, 'कच्चे तेल सर्वांना परवडणाऱ्या किमतीत मिळायला हवे आणि ते शस्त्र म्हणून वापरता येणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com