Retail Inflation Rate: महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, इन्फ्लेशन 25 महिन्यांतील नीचांकी पातळीवर

Government: महागाईच्या आघाडीवर सलग तिसऱ्या महिन्यात सरकार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Retail Inflation
Retail InflationDainik Gomantak
Published on
Updated on

Retail Inflation Rate: रिटेल इन्फ्लेशनबाबत सर्वात मोठी बातमी येत आहे. महागाईच्या आघाडीवर सलग तिसऱ्या महिन्यात सरकार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आकडेवारीनुसार, मे महिन्यात रिटेल इन्फ्लेशन दर 4.25 टक्क्यांवर आला आहे. जो एप्रिल 2021 नंतर सर्वात कमी दिसला आहे. एप्रिल महिन्यात हाच आकडा 4.70 टक्के होता. तर मार्च महिन्यात तो 5.7 टक्क्यांवर पोहोचला होता.

दरम्यान, सलग तिसऱ्या महिन्यात चलनवाढीत घट झाली आहे. फेब्रुवारीपासून 205 बेसिस पॉइंट्सची घसरण दिसली आहे.

तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत मान्सूनवरच महागाईचे आकडे अवलंबून असतील. यावेळी कृषी क्षेत्रावरही एल निनोचा प्रभाव दिसून येईल.

Retail Inflation
RBI Governer : 2000 नंतर 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार का? वाचा, RBI गव्हर्नर काय म्हणतायेत

अन्नधान्याच्या महागाईतही घट झाली

अन्नधान्याच्या महागाईबद्दल (Inflation) बोलायचे झाल्यास, मे महिन्यात त्यात घट झाली आहे. एप्रिल महिन्यात अन्नधान्य महागाई 3.84 टक्के होती, जी मे महिन्यात 2.91 टक्क्यांवर आली आहे. ग्रामीण महागाई 4.17 टक्के तर शहरी महागाई 4.27 टक्के होती.

बेस इफेक्ट व्यतिरिक्त, खाद्य आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे अशी आकडेवारी दिसून येत आहे. ऊर्जेच्या किमतींव्यतिरिक्त, तृणधान्ये आणि भाजीपाल्यांच्या किमती घसरल्याने महागाईची पातळीही खाली आली आहे.

एलपीजी आणि रॉकेलच्या आंतरराष्ट्रीय किमतीत घसरण झाल्यामुळे मे महिन्यात इंधनाच्या महागाईत लक्षणीय घट झाली आहे.

RBI ने काय अंदाज लावला आहे?

पतधोरणाच्या बैठकीत आरबीआयने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चलनवाढीचा अंदाज 5 टक्क्यांच्या खाली ठेवला आहे.

याचा अर्थ आरबीआयच्या म्हणण्यानुसार पहिल्या तिमाहीत किरकोळ चलनवाढ 4.6 टक्के राहू शकते. नंतरच्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो.

Retail Inflation
Rs 500 Fake Currency: 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBI चं वाढलं टेंशन!

आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, किरकोळ महागाई दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

तसेच, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी अंदाज 5.1 टक्के वर्तवण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात की, यावेळी आरबीआयचे लक्ष्य 4 टक्क्यांहून अधिक महागाई दराचे आहे.

रेपो दर स्थिर

या महिन्यात झालेल्या आरबीआय (RBI) एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्या महिन्यात रेपो दर स्थिर ठेवला आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 6.50 टक्के आहे.

गेल्या वेळी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढला आहे.

Retail Inflation
RBI चा मोठा निर्णय, 'या' बॅकेला ठोठावला लाखोंचा दंड; लाखो ग्राहकांना बसणार फटका!

तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या शेवटपर्यंत आरबीआय रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. दुसरीकडे, काही तज्ज्ञांचे मत आहे की, महागाई दर ऑगस्टपर्यंत 4 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर ऑगस्टच्या दर चक्रात व्याजदर 0.15 टक्क्यांवरुन 0.25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

IIP डेटा

भारताचे औद्योगिक उत्पादन म्हणजेच आयआयपी या वर्षी एप्रिलमध्ये 4.2 टक्के दराने वाढले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 6.7 टक्क्यांनी वाढला होता.

NSO डेटानुसार, एप्रिल 2023 मध्ये, उत्पादन क्षेत्रातील उत्पादन 4.9 टक्के आणि खाण उत्पादनात 5.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, वीज उत्पादनात 1.1 टक्के घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com