Facebook will give loan up to 50 lakhs for startup's  Dainik Gomantak
अर्थविश्व

आता फेसबुक देणार स्टार्टअप कंपन्यांना 50 लाखापर्यंत कर्ज

फेसबुकने (Facebook) आता लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी (MSME) लघु व्यवसाय कर्ज नावाचा उपक्रम सुरू केला आहे.(Facebook loan for Startup's)

दैनिक गोमन्तक

फेसबुकने (Facebook) आता लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी (MSME) लघु व्यवसाय कर्ज नावाचा उपक्रम सुरू केला आहे.याद्वारे लहान आणि मध्यम व्यावसायिकांना 5 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल (Facebook loan for Startup's). हे कर्ज देशातील 200 शहरांमध्ये उपलब्ध होईल. यासाठी फेसबुकने ऑनलाइन कर्ज वितरण कंपनी इंडिफाईशी करार केला आहे.(Facebook will give loan up to 50 lakhs for startup's)

नेमका व्याजदर काय असेल

फेसबुकच्या या कर्जासाठी, 17 ते 20 टक्के व्याज दरवर्षी भरावे लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही महिला उद्योजक असाल तर तुम्हाला सामान्य दरापेक्षा 0.2 टक्के कमी व्याज द्यावे लागेल.या कर्जाची विशेष गोष्ट म्हणजे कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क असणार नाही. त्याचबरोबर, दुसरीकडे जेव्हाही एखादी बँक गृहकर्ज देते, तेव्हा ग्राहकाला त्यासाठी प्रक्रिया शुल्क भरावे लागते. आणि फेसबुक हे कर्ज फक्त पाच दिवसात उपलब्ध होणार आहे.

हे लक्षात घेणे गरजेचे -

फेसबुक या कर्जाच्या कार्यक्रमांतर्गत कर्ज फक्त त्या छोट्या उद्योजकांना उपलब्ध होईल जे कमीतकमी सहा महिने म्हणजे 180 दिवस फेसबुक किंवा त्याच्या ग्रुपच्या इतर अॅप्सवर जाहिरात करत आहेत.फेसबुक ही योजना यासाठीच सुरू करत आहे जेणेकरून अधिकाधिक कंपन्या त्याच्या प्लॅटफॉर्मवर आणि इतर अॅप्सवर जाहिरात करतील.

फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले की, भांडवलाला अधिक महत्त्व आहे कारण ते छोट्या कंपन्यांना सावरण्यास आणि कंपनीच्या वाढीला गती देण्यास मदत करू शकते. या कार्यक्रमाअंतर्गत कर्ज वितरण आणि पुनर्प्राप्तीचे निर्णय केवळ ऑनलाइन वेंडर घेतील.फेसबुकचा हा उपक्रम वाढीस मदत करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, एमएसएमई देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. फेसबुक म्हणते की हे काम पैसे कमवण्यासाठी करत नाही. यात कोणतेही महसूल वाटप होणार नाही, परंतु उद्योगाच्या वाढीस मिळालेल्या वाढीमुळे त्याचा फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

SCROLL FOR NEXT