Big Bull यांनी या मोठ्या बँकेचे 2.88 कोटी शेअर्स केले खरेदी

शेअर बाजारातील (Stock Market) दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh JhunJhunwala) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत 1.59 टक्के हिस्सा खरेदी केला आहे.
Rakesh  JhunJhunwala acquires 2.88cr shares in Canara Bank
Rakesh JhunJhunwala acquires 2.88cr shares in Canara Bank Dainik Gomantak
Published on
Updated on

शेअर बाजारातील (Stock Market) दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh JhunJhunwala) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत 1.59 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेचे (Canara Bank) 2.88 कोटी शेअर्स (Shares) खरेदी केले आहेत. यापूर्वी आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत, झुनझुनवाला यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये भागभांडवल खरेदी केले होते. झुनझुनवाला यांनी सेलचे 5.75 कोटी शेअर्स खरेदी करत कंपनीचा 1.4 टक्के हिस्सा खरेदी केला होता . त्याच वेळी, त्यांनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये (Indiabulls Housing Finance) 1 कोटी शेअर्स म्हणजे या कंपनीचा 2.2 टक्के हिस्सा खरेदी केला होता .(Rakesh JhunJhunwala acquires 2.88cr shares in Canara Bank)

कॅनरा बँकेचे शेअर्स घसरले-

कॅनरा बँकेने गेल्या एका वर्षात 43 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आज मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) वर बँकेचा स्टॉक 4.65 अंक 2.99 टक्क्याने खाली येऊन 151.05 वर बंद झाला आहे.

Rakesh  JhunJhunwala acquires 2.88cr shares in Canara Bank
LIC चा IPO होणार ऐतिहासिक, सरकार देणार FDI ला मंजुरी

झुनझुनवाला यांनी टायटनमधील हिस्सा कमी केला-

अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत टाटा समूहाच्या टायटन कंपनीतील हिस्सा कमी केला आहे. झुनझुनवाला दाम्पत्याने सलग तिसऱ्या तिमाहीत टायटनमधील आपला हिस्सा कमी केला आहे.झुनझुनवाला दाम्पत्याकडे आता टायटनमध्ये 4.81 टक्के हिस्सा आहे. 2003 च्या जून तिमाहीनंतर हे सर्वात कमी आहे. AceEquity च्या आकडेवारीनुसार, टायटनमधील राकेश झुनझुनवालाचा हिस्सा 3.97 टक्क्यांवरून 3.72 टक्क्यांवर आला आहे. त्याचबरोबर कंपनीत त्यांच्या पत्नीचा हिस्सा 1.09 टक्के इतका आहे.

एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील हिस्सेदारी वाढवली-

तर दुसरीकडे झुनझुनवाला यांनी एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील आपला हिस्सा वाढवला आहे. एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेसने सांगितले आहे की बिग बुलचे आता कंपनीत 1,51,25,000 रुपयांचे शेअर्स आहेत. 30 जूनपर्यंत त्यांनी कंपनीत 1.61 टक्के भागभांडवल ठेवले होते. या कंपनीतील त्याच्या समभागाची किंमत 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

टाटा मोटर्सचे 50 लाख शेअर्स झुनझुनवाला यांनी विकले-

झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्सचे 50 लाख शेअर्स विकले आहेत. ताज्या शेअरहोल्डिंग आकडेवारीनुसार, झुनझुनवालाचा टाटा मोटर्समधील हिस्सा आता 1.14 टक्के आहे. या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्समधील आपला हिस्सा कमी केला आहे.त्यांच्याकडे आता 11.94 टक्के शेअर्स आहेत, जे मार्चच्या शेवटी 12.92 टक्के होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com