EPFO has declared 8.15 percent interest rate for the financial year 2022-23.
EPFO has declared 8.15 percent interest rate for the financial year 2022-23. Dainik Gomantak
अर्थविश्व

EPF Interest: ईपीएफ चे व्याज कधी येणार? एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट

Ashutosh Masgaunde

EPFO has declared 8.15 percent interest rate for the financial year 2022-23:

EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. याला अर्थ मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली होती त्यानंतर EPFO ​​ने एका परिपत्रकाद्वारे याची अधिसूचना काढली.

हे व्याज या महिन्यापासूनच सभासदांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र अनेकांनी व्याज जमा होण्यास विलंब होत असल्याने ट्विटरवर तक्रारी सुरू केल्या आहेत. त्यांच्या खात्यात व्याज कधी जमा होणार, असा सवाल अनेक सदस्य करत आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाचे व्याजही त्यांच्या खात्यात आले नसल्याची काही सदस्यांची तक्रार आहे. मात्र, ईपीएफओने सदस्यांना संयम राखण्याचे आवाहन केले असून कोणाचेही नुकसान होणार नाही, असे म्हटले आहे.

EPFO पीएफ खातेदारांनी खात्यात जमा केलेली रक्कम अनेक ठिकाणी गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. याचा फायदा ईपीएफओच्या सात कोटींहून अधिक सदस्यांना होणार आहे.

कर्मचार्‍याच्या मूळ पगारावर 12% ची कपात EPF खात्यासाठी केली जाते. जर आपण नियोक्त्याबद्दल बोललो, तर त्याने केलेल्या कपातीपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएस (Employees Pension Scheme) मध्ये जाते, तर उर्वरित 3.67 टक्के ईपीएफमध्ये जाते.

मागील वेळी सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे सभासदांच्या खात्यात उशिरा व्याजाचे पैसे आले होते. तुमच्या खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास त्यावर तुम्हाला 8,150 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मागील वेळेच्या तुलनेत प्रति लाख 50 रुपये अधिक व्याज मिळेल.

अशा प्रकारे चेक करा बॅलेन्स

तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेन्स (PF Account Balance) जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमची शिल्लक तपासू शकता.

यासाठी तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जाऊन तुमचा बॅलेन्स जाणून घेऊ शकता.

या साइटला भेट दिल्यानंतर ई-पासबुकवर (E-Passbook) क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.

हे केल्यानंतर, तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित माहिती दिसू लागेल. येथे तुम्हाला कस्टमर आयडी दिसेल. तुम्ही तो निवडल्यास, तुम्हाला तुमची पीएफ शिल्लक ई-पासबुकवर दिसेल.

मिस कॉल आणि एसएमएसवरही चेक करता येईल बॅलेन्स

तुमच्या पीएफ खात्याशी लिंक केलेल्या नंबरवरून तुम्हाला ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल करावा लागेल.

मिस्ड-कॉल दिल्यानंतर लगेच, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये पीएफ बॅलेन्सबद्दल माहिती उपलब्ध असेल.

तुम्ही एसएमएसद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता. यासाठी तुमचा UAN क्रमांक ईपीएफओकडे रजिस्टर आसावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT