कंपनीने EPF खात्यात पैसे जमा केले नाहीत तर घाबरू नका; अशी करा तक्रार झटक्यात होईल कारवाई

EPF: जर तुमची कंपनी दरमहा तुमच्या पगारातून ईपीएफचे पैसे कापत असेल पण ते वेळेवर जमा करत नसेल किंवा कोणत्याही महिन्यात पैसे जमा केले नसतील, तर तुम्ही ईपीएफओकडे तक्रार करून तुमचे पैसे सहज मिळवू शकता.
EPF |EPFO
EPF |EPFO Dainik Gomantak

Step by Step Process To Register Complaint If The Company Has Not Deposited the money in the EPF Account:

बर्‍याच वेळा असे होऊ शकते की तुमची कंपनी तुमच्या पगारातून ईपीएफची रक्कम कापते पण ती ईपीएफ खात्यात जमा करत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात पण सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती.

जर कंपनी आर्थिक संकटातून जात असेल, तर ती पगारातून पैसे कापते पण ते ईपीएफ खात्यात जमा करू शकत नाही. आता अशा परिस्थितीत काय करायचं हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल.

तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी हा EPF काय आहे आणि त्याअंतर्गत पैसे का कापले जातात? ईपीएफ जमा केल्यामुळे कापलेले पैसे कुठे आहेत? जर त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत तर तुम्ही तक्रार कुठे करावी यांबद्दल थोडेसे.

EPF म्हणजे काय?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही एक महत्त्वाची सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे नियंत्रित केली जाते.

हे ईपीएफ खाते उघडण्यासाठी कर्मचाऱ्याला कुठेही जाण्याची गरज नसते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीत पहिल्यांदा नोकरीला लागते, तेव्हा त्या कंपनीच्या वतीनेच त्याचे ईपीएफ खाते उघडले जाते.

ईपीएफमध्ये पैसे का कापले जातात?

1952 मध्ये भारतात सुरू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत (EPF योजना) कंपनी आणि कर्मचारी दोघेही कर्मचारी काम करेपर्यंत EPF द्वारे दरमहा ठराविक रक्कम योगदान देतात.

निवृत्तीच्या वेळी तुम्हाला ईपीएफमध्ये जमा केलेले पैसे मिळतात. तसेच, जोपर्यंत तुमचे पैसे त्यात जमा आहेत, तोपर्यंत तुम्हाला इतर बचत योजनांच्या तुलनेत त्यावर अधिक व्याजही मिळते. काही विशिष्ट परिस्थितीत, तुम्ही निवृत्तीपूर्वीच तुमचे पैसे EPFO ​​खात्यातून काढू शकता.

EPF |EPFO
Aadhaar Card: घरबसल्या मिळवा ब्लू आधार कार्ड; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ईपीएफचे पैसे खात्यात न आल्यास काय करावे?

जर तुम्ही तुमचे स्वतःचे EPF खाते वेळोवेळी तपासले आणि तुम्हाला दिसले की एखाद्या महिन्यात तुमच्या नियोक्त्याने तुमच्या पगारातून EPF ची रक्कम कापली आहे पण ती जमा केली नाही, तर तुम्ही ताबडतोब कंपनीला याची माहिती द्यावी.

याबद्दल तक्रार करावी. तुम्ही याबाबत ऑनलाइन तक्रारही करू शकता. त्याबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्हाला EPFIGMS च्या पोर्टलवर जावे लागेल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमची तक्रार पीएफ प्राधिकरणाकडे लेखी देखील देऊ शकता.

EPF |EPFO
IPO: बंपर कमाईसाठी तयार व्हा! 10 कंपन्याचे आयपीओ करतील गुंतवणूकदारांना मालामाल

ऑनलाइन तक्रार कशी करावी

  • ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी https://epfigms.gov.in/ ला भेट द्या.

  • यानंतर येथे दिसणार्‍या 'register grievance' वर क्लिक करा.

  • नंतर तुमचे स्टेटस निवडा (पीएफ सदस्य)

  • यानंतर, UAN चे तपशील, सुरक्षा कोड टाकल्यानंतर, 'get details' वर क्लिक करा.

  • UAN तपशील दिल्यानंतर, 'Get OTP' वर क्लिक करा

  • त्यानंतर मोबाईल नंबरवर मिळालेला पासवर्ड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • OTP सत्यापित झाल्यानंतर, 'OK' वर क्लिक करा आणि तुमचे नाव, लिंग, संपर्क माहिती इत्यादी माहिती भरा.

  • यानंतर दस्तऐवज (पगार स्लिप) आणि ईपीएफ खाते विवरण अपलोड करा जे दर्शविते की पगारातून पैसे कापले गेले आहेत परंतु जमा केले गेले नाहीत.

  • तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे पुष्टीकरण आणि तक्रार क्रमांक मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com