India-China: भारत की चीन? येत्या वर्षांत परदेशी गुंतवणूकदारांची 'या' देशाला पंसती

India-China: भारत अनेक वर्षांपासून विकसित देश होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर काय परिणाम होईल हे जाणून घेतले महत्त्वाचे आहे.
Foreign Investors Will Like To Invest In India In The Coming Years
Foreign Investors Will Like To Invest In India In The Coming YearsDainik Gomantak

Foreign Investors Will Like To Invest In India In The Coming Years:

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आता अव्वल स्थानी आहे. यामध्ये भारताने चीनलाही मागे टाकले आहे.

विकसित देशांच्या यादीत सहभागी होण्यासाठी भारत अनेक दशकांपासून प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत 2075 पर्यंत भारताचे भांडवल चौपट होईल, अशी अनेक विश्लेषकांची अपेक्षा आहे. ती12 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जी चीनच्या बरोबरीचे असेल

भारत आणि चीनची अर्थव्यवस्था

भारत आणि चीन हे दोन्ही गुंतवणूकदार आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देश आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

चीन (China) ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) आहे. त्यांच्याकडे एक प्रचंड ग्राहक बाजारपेठ आणि उत्पादन युनिट्स आहेत. पाश्चिमात्य देशांशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप चालना मिळाली आहे.

अशा परिस्थितीत भारत दरवर्षी चीनच्या अर्थव्यवस्थेला 6 ते 7 टक्क्यांनी मागे टाकेल असे मानले जाते. याचा परिणाम मध्यमवर्गावर होणार आहे.

गुंतवणुकीच्या संधी

येत्या काळात भारतात नवीन बाजारपेठा निर्माण होतील, याचा फायदा भारताला होईल. त्याच वेळी, अनेक कंपन्या चीनसाठी उत्पादन पर्याय शोधत असतील.

भारत जागतिक स्तरावर विकास करेल. भारताचा विकास दर (Growth Rate) वाढल्याने उत्पादनांसह ग्राहकांचा खर्चही वाढेल. याशिवाय गुंतवणुकीच्या नव्या संधी खुल्या होतील.

Foreign Investors Will Like To Invest In India In The Coming Years
Personal Loan: स्वस्त पर्सनल लोनसाठी या 4 बँका सर्वोत्तम पर्याय

भारतीय शेअर बाजारावर परिणाम

पुढील काही काळात वाढत्या गुंतवणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळणार आहे. भारतीय स्टॉक्स महाग होतील. परदेशी गुंतवणूकदार (Investors) दोन्ही देशांच्या बाजारपेठेची तुलना करत असतात. त्यानंतर कुठे गुंतवणूक करावी हे ते ठरवतात.

चीनच्या बाजारात सध्या मंदी (Recession) असल्याने स्टॉक्सची विक्री सुरू आहे. अशा परिस्थितीत चीनला आधीसारखा उच्च विकास साधता येणार नाही. त्यामुळे तेथे उपलब्ध संधी मर्यादित राहतील.

Foreign Investors Will Like To Invest In India In The Coming Years
Property Transfer: सरकारचा नवा निर्णय; आता फक्त 5 हजारांत होणार नातेवाईकांच्या नावे करोडोंची प्रॉपर्टी

दरडोई उत्पन्नात वाढ

कोणताही गुंतवणूकदार शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवतो.

भारताने विकास दरात वाढ केल्यास भारताचे दरडोई उत्पन्नही (GDP) वाढेल. चीन आणि केवळ अमेरिकाच नव्हे, तर जपान, दक्षिण कोरिया(South Korea) आणि युरोप (Europe) यांच्यातील भू-राजकीय तणाव आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे, असे मानले जाते. त्यामुळे येत्या काळात भारतासमोर मोठी संधी असले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com