Adani Group Stock Crash Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group Stock Crash: हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

काही स्टॉक्सना लोअर सर्किट; रिपोर्टमध्ये ग्रुपच्या शेअर्समध्ये 85 टक्के ओव्हर व्हॅल्युएशनचा दावा

Akshay Nirmale

Adani Group Stock Crash: सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात शुक्रवारी सकाळी अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या शेअर्सच्या 85 टक्के ओव्हर व्हॅल्युएशन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अदानी समुहातील शेअर्स कोसळले आहेत.

अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक उघडताच 19 टक्क्यांनी घसरला. बुधवारी हा शेअर 2517 रुपयांवर बंद झाला होता, जो बाजार उघडल्यानंतर 482 रुपयांनी खाली घसरला. सध्या हा शेअर 13.22 टक्क्यांच्या घसरणीसह २१७७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्येही मोठी घट झाली आहे. शेअर 3660 रुपयांच्या शेवटच्या बंदवरून 700 रुपयांपर्यंत म्हणजे 19 टक्क्यांनी घसरून 2963 रुपयांवर आला. सध्या शेअर 13.66 टक्क्यांच्या घसरणीसह 3147 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1857 रुपयांच्या आधीच्या बंद पातळीवरून 1564 रुपयांवर 15.77 टक्क्यांनी म्हणजे 293 रुपये प्रति शेअर घसरला. सध्या हा शेअर 7.74 टक्क्यांच्या घसरणीसह 1714 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी ग्रुपच्या या शेअर्समध्ये लोअर सर्किट

अदानी समूहाच्या इतर समभागांमध्ये अदानी पॉवर आणि अदानी विल्मार हेही 5 टक्क्यांनी घसरले असून दोन्ही समभाग लोअर सर्किटमध्ये आहेत. लोअर सर्कीटमध्ये विक्री जास्त होणे आणि खरेदीदार नसणे.

बुधवारी 713 रुपयांवर बंद झालेला अदानी पोर्ट्सचा शेअर उघडताच 675 रुपयांपर्यंत घसरला, सध्या हा शेअर 2.63 टक्क्यांनी घसरून 695 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी समूहाचे इतर समभाग NDTV 5 टक्के, अंबुजा सिमेंट 7.63 टक्के आणि ACC 6.09 टक्क्यांनी घसरले आहेत.

FPO च्या दिवशी मोठी घसरण

अदानी एंटरप्रायझेसची फॉलो-ऑन ऑफर शुक्रवारपासून सुरू आहे. त्याच दिवशी स्टॉकमध्ये मोठी घसरण होते. 3388 च्या शेवटच्या बंद पातळीपासून, स्टॉक 6.13 टक्क्यांनी घसरून 3180 रुपयांच्या पातळीवर आला आहे.

सध्या हा शेअर 2.25 टक्क्यांच्या घसरणीसह 3312 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत आता एफपीओच्या प्राइस बँडच्या पातळीच्या जवळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

Goa Assembly Live: "हम किसीसे काम नहीं" दाखवण्याचा प्रयत्न: आमदार विजय सरदेसाई

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

SCROLL FOR NEXT