IT layoffs: आता या कंपनीतील तीन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

कोअर बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कंपनीचे पाऊल
IT layoffs
IT layoffsDainik Gomantak
Published on
Updated on

SAP Layoff: जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे 3,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे.

पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्‍या या कंपनीने म्हटले आहे की, "कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली जाणार आहे.

IT layoffs
Pakistan Economic Crisis: अल्टो 25 लाखांना, तर वॅगनआर कारची किंमत 30 लाख रूपये...

2022 च्या कंपनीच्या आर्थिक ताळेबंद असलेल्या अहवालात म्हटले आहे की, "कंपनीच्या या धोरणामुळे सुमारे 2.5 टक्के कर्मचार्‍यांवर परिणाम होऊ शकतो. SAP कडे जगभरात सुमारे 120,000 कर्मचारी आहेत, याचा अर्थ सुमारे 3,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना आहे.

मेटा, अॅमेझॉन, गुगल, आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात या कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता एसएपी कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

IT layoffs
PPF Calculator: पीपीएफबाबत अर्थमंत्री करणार मोठी घोषणा, 'या' खास ट्र‍िकने तुम्ही बनू शकता करोडपती!

कंपनीने म्हटले आहे की, कर्मचारी कमी झाल्यामुळे कंपनीचा 250 ते 300 दशलक्ष युरोची बचत होणार आहे. तर 2023 च्या पहिल्या तिमाहीत पुनर्रचनेमुळे 2024 पासून वार्षिक 300-350 दशलक्ष युरोची बचत होण्याची अपेक्षा आहे. ते पैसे कंपनीच्या धोरणात्मक वाढीच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीसाठी वापरले जाऊ शकतात. एसएपीला मूळ क्लाउड व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल, असेही कंपनीने म्हटले आहे.

2022 मध्ये SAP ने 30.9 अब्ज युरोचा महसूल मिळवला. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे. तथापि, कंपनीचा ऑपरेटिंग नफा 2021 च्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी, फक्त 8 अब्ज युरोवर आला. 2023 मध्ये SAP ला ऑपरेटिंग नफ्यात 10 ते 13 टक्के वाढीची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com