Direct-to-mobile (D2M) technology Dainik Gomantak
अर्थविश्व

नेटवर्कची चिंता सोडा अन् पाहा मनसोक्त चित्रपट, वेब सिरीज; आता सिम कार्ड, इंटरनेटशिवाय होणार व्हिडिओ स्ट्रीमिंग

Direct to Mobile: हे अगदी डायरेक्ट टू होम (DTH) सारखे आहे. त्याचा मोठा फायदा असा होईल की, त्या भागातील यूजर्स OTT अ‍ॅप्सवर व्हिडीओ पाहू शकतील जेथे इंटरनेटची सुविधा नाही.

Ashutosh Masgaunde

Direct-to-mobile (D2M) technology to be tested in 19 cities soon, Video streaming will be without SIM card, internet:

‘डायरेक्ट-टू-मोबाइल’ प्रसारणाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. यामध्ये मोबाइल वापरकर्ते सिम कार्ड किंवा इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हिडिओ स्ट्रीम करू शकतील.

एका परिषदेत बोलताना, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, देशांतर्गत डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) तंत्रज्ञानाची लवकरच 19 शहरांमध्ये चाचणी केली जाईल आणि या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी 470-582 MHz स्पेक्ट्रम राखून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

चंद्रा म्हणाले की, 25-30 टक्के व्हिडिओ ट्रॅफिक D2M वर हलवल्याने 5G नेटवर्कवरील गर्दी कमी होईल, ज्यामुळे देशातील डिजिटल परिवर्तनाला गती मिळेल. गेल्या वर्षी, D2M तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी एक चाचणी प्रकल्प बेंगळुरू, कर्तव्य पथ आणि नोएडा येथे चालवण्यात आला.

चंद्रा म्हणाले की, D2M तंत्रज्ञान देशभरातील सुमारे 8-9 कोटी "टीव्ही डार्क" घरांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. देशातील 28 कोटी कुटुंबांपैकी केवळ 19 कोटी कुटुंबांकडे दूरदर्शन संच आहेत.

या परिषदेत बोलताना चंद्रा पुढे म्हणाले, देशात 80 कोटी स्मार्टफोन आहेत आणि यूजर्ससाठी 69 टक्के कन्टेन्ट व्हिडिओ स्वरूपात आहे. गेल्या वर्षी, D2M तंत्रज्ञानाची पायलट चाचणी बेंगळुरू, कर्तव्य पाथ आणि नोएडा येथे घेण्यात आली.

चंद्रा म्हणाले की, व्हिडिओच्या मोठ्या वापरामुळे, मोबाइल नेटवर्क ब्लॉक होते, ज्यामुळे ते अधूनमधून प्ले होते.

सांख्य लॅब्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर यांनी विकसित केलेले D2M प्रसारण तंत्रज्ञान, व्हिडीओ, ऑडिओ आणि डेटा सिग्नल थेट सुसंगत मोबाइल आणि स्मार्ट उपकरणांवर प्रसारित करण्यासाठी स्थलीय दूरसंचार पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक प्रसारक-नियुक्त स्पेक्ट्रम वापरते.

D2M म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

D2M हे थेट मोबाइल ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञान आहे ज्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. D2M च्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय व्हिडिओ पाहू शकता.

हे अगदी डायरेक्ट टू होम (DTH) सारखे आहे. त्याचा मोठा फायदा असा होईल की, त्या क्षेत्रातील वापरकर्ते आता OTT अ‍ॅप्लिकेशन्सवर व्हिडिओ बघू शकतील, जिथे इंटरनेटची सोय नसेल. D2M हा देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचणार आहे. D2M लाँच झाल्यावर, उच्च-गतीच्या इंटरनेटची आवश्यकता नसतानाही व्हिडिओ पाहणे शक्य होईल, पण एक मोठी अडचण आहे की सध्याच्या बाजारातील मोबाइलमध्ये हे सपोर्ट केले जात नाही. D2M लाँच झाल्यावर, D2M सपोर्ट असलेले नवीन मोबाइल देखील बाजारात आणले जातील. D2M सपोर्टसाठी, सर्व मोबाइल ब्रँड्सनी आपल्या मोबाइलमध्ये D2M अँटेना बसवावे लागेल, जो DTH साठीच्या सेटअप बॉक्ससारखे काम करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT