CNG PNG Price Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

CNG PNG Price: एकाच महिन्यात दुसऱ्यांदा CNG-PNG दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

CNG PNG दरवाढ तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

CNG PNG Price Hike: मुंबईत CNG आणि PNG पुन्हा एकदा महाग झाले आहेत. शहर गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG च्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ केली आहे. त्याचवेळी पाइप्ड नैसर्गिक वायूही प्रति युनिट 4 रुपयांनी महागला आहे. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. एका महिन्यातील ही दुसरी वाढ आहे.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून, पुरवठादार आणि वितरकांना वाढत्या किमतींमुळे औद्योगिक पुरवठा कमी करणे भाग पडले. एप्रिल महिन्यापासूनची ही सहावी वाढ आहे.

महानगर गॅसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आम्ही खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही सीएनजीच्या किरकोळ किमतीत 86 रुपये आणि घरगुती पीएनजी 52.50 रुपयाने वाढवले ​​आहेत. यापूर्वी 12 जुलै रोजी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सीएनजीच्या किरकोळ किंमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशांतर्गत आणि आयातित नैसर्गिक वायूच्या किमतीत 110 टक्क्यांहून अधिक वाढ केली होती. यासह राज्याने या इंधनावरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT