Indian Economy: देशातील वाढत्या महागाईबाबत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत उत्तर देताना सांगितले की, महागाई नाही हे कोणीही नाकारत नाही, परंतु जगातील अनेक देशांपेक्षा भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. विरोधक नेहमीच उद्योगपतींचे नाव घेऊन वाद वळविण्याचे काम करतात, असा आरोप निर्मला सितारामन यांनी केला आहे. (Monsoon Session: Finance Minister Nirmala Sitharaman)
वस्तूंचे भाव वाढले हे कोणीही नाकारत नाही. आमच्याकडे चलनवाढीचा दर आहे, चलनवाढीचा दर 7% आहे. सरकार आणि RBI तो दर 7% च्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांबाबत आपले म्हणणे मांडताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, विरोधक म्हणतात की सरकार प्रतिसाद देत नाही. आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी लोकसभेत आहोत, असे सितारामन म्हणाल्या.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राज्यसभेत महागाई आणि वाढत्या किमतींबाबत उत्तर देत असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला.विरोधकांच्या सततच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. तहकूब झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू झाले. त्याचवेळी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
दूध दह्यावरील जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांचे उत्तर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विरोधकांना उत्तर देताना सांगितले की, अजूनही किरकोळ विक्रेत्यांना दूध दही इत्यादींवर जीएसटी भरावा लागत नाही. जीएसटीपूर्वीही डाळी, रवा बेसन इत्यादींवर व्हॅट आकारला जात होता. केरळमध्येही पिठावर एक ते पाच टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारला जात होता. झारखंडमध्येही मैदा, रवा आणि बेसनावर पाच टक्के कर लावण्यात आला होता. महाराष्ट्रातही पनीर दुधाच्या लस्सीवर 6 टक्के तर बंगालमध्ये पनीरवर 6 टक्के व्हॅट आकारला जात होता.
बंगालचे नाव येताच TMC वॉकआउट
बंगालचे नाव येताच टीएमसी खासदार डेरेक यांनी मुद्दा मांडून आक्षेप घेतला. यानंतर टीएमसीने सभात्याग केला. सभागृह नेते पियुष गोयल म्हणाले की, टीएमसीचा पर्दाफाश झाला आहे. तर त्याचवेळी अर्थमंत्री त्यांचे उत्तर देत म्हणाल्या की, जोपर्यंत रुग्णालयातील खाटांचा प्रश्न आहे तोपर्यंत आयसीयू आणि आपत्कालीन स्थितीवर कोणताही परिणाम होत नाही, परंतु जर तुम्ही रुग्णालयात 5 हजार किंवा त्याहून अधिक खोली घेत असाल तर जीएसटी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.