Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Petrol Diesel Prices: पेट्रोल - डिझेल महागणार? उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ, सर्वसामान्यांची वाढली चिंता

Petrol Diesel Excise Duty Notification: सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याबाबत राजपत्रित अधिसूचना जारी केली.

Manish Jadhav

central govt hikes excise duty on petrol and diesel

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याबाबत अधिसूचना जारी केली. सरकारने वाढवलेल्या उत्पादन शुल्काचा थेट सर्व सामान्यांच्या खिशावर भार पडू शकतो.

खरंतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे सरकारने भारत पेट्रोलियम, रिलायन्स आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या पेट्रोलियम कंपन्यांवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे.

उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत 15 टक्क्यांनी घट झाली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 1 बॅरल कच्च्या तेलाची किंमत $63. 34 एवढी आहे, जी त्याची सर्वात कमी पातळी आहे.

अशा परिस्थितीत, देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा नफा वाढला आहे. हे लक्षात घेऊनच सरकारने आपले उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली.

सर्व सामान्यांवर काय परिणाम होणार?

पेट्रोल आणि डिझेलवरील वाढलेले उत्पादन शुल्क मंगळवारपासून म्हणजेच 8 एप्रिलपासून लागू होतील. याचा थेट परिणाम सध्या तेल कंपन्यांवर होणार आहे. आता हे पाहायचे आहे की, तेल कंपन्या त्यांच्या नफ्यातून ही गरज पूर्ण करतात की सर्व सामान्यांवर हा भार टाकतात.

जर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या तर त्याचा थेट परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होईल.

15 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत

तेल कंपन्यांनी शेवटचे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 मार्च रोजी बदलल्या होत्या. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी केल्या होत्या.

तेव्हापासून, देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी झाल्या होत्या, सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे, तर चेन्नई, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT