Goa Petrol Diesel Prices: सिंधुदुर्ग, बेळगाव पेक्षा कमी दराने गोव्यात मिळतंय पेट्रोल, डिझेल; जाणून घ्या ताजे भाव

Goa petrol price today: सिंधुदुर्गमध्ये गोव्याच्या तुलनेत पेट्रोल 8 रुपयांनी महाग आहे.
Goa Today Petrol Diesel Prices
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल - डिझेलच्या दरात सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता होती. पण, अर्थसंकल्पात इंधनाच्या दरात मोठा दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, देशातील इंधनाचे दर जैसे थे आहेत. गोव्यात देखील मोठा बदल झालेला नाही. मात्र, गोव्यात शेजारच्या महाराष्ट्र आणि बेळगावपेक्षा कमी दरात पेट्रोल - डिझेल मिळत आहे.

सिंधुदुर्ग आणि बेळगावमध्ये काय आहेत इंधनाचे दर?

सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 105.50 प्रति लिटर दराने तर डिझेल 92.03 प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. तर, सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो एवढा आहे.

दुसरीकडे बेळगाव, कर्नाटकमध्ये पेट्रोल 103.59 प्रति लिटर दराने तर डिझेल 89.63 प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. बेळगावमध्ये सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो एवढा आहे.

Goa Today Petrol Diesel Prices
Anjuna: हणजुणातील 8 आस्थापने बंद! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश; पब्ससह 24 ठिकाणी तपासणी

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 97.30

 Panjim ₹ 97.30

South  Goa ₹ 96.59

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 89.03

 Panjim ₹ 89.03

South Goa ₹ 88.35

गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:

Goa CNG Rate: ₹ 91 प्रति किलो

Goa Today Petrol Diesel Prices
Raibandar Road: रायबंदर रस्ता शेवटच्या टप्प्यात, पाणी तुंबण्याचा धोका होणार कमी; कंपनीचा दावा

किती आहे फरक?

सिंधुदुर्गमध्ये गोव्याच्या तुलनेत पेट्रोल 8 रुपयांनी महाग आहे. तर, बेळगावमध्ये जवळपास 6.50 ते 7 रुपयांनी पेट्रोल महाग आहे. तसेच, सिंधुदुर्गमध्ये डिझेल देखील गोव्याच्या तुलनेत तीन रुपयांनी महाग आहे. दरम्यान बेळगाव आणि गोव्यातील डिझेलचे दर एकसारखेच आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत शुक्रवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली. देशातील चार प्रमुख महानगरे दिल्ली-मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.

शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत 0.14 टक्क्यांनी वाढून 0.10 डॉलर प्रति बॅरल 71.39 डॉलर वर पोहोचली. तर ब्रेंट क्रूडची किंमत 0.21 टक्के किंवा 0.16 डॉलरने वाढली आणि प्रति बॅरल 75.18 डॉलरवर पोहोचली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com