PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Scheme बाबत केंद्र सरकारने दिली खूशखबर, पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदी-आनंद!

PPF Scheme Update: आता मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. याबाबतची माहिती सरकारने दिली आहे.

Manish Jadhav

PPF Scheme Latest Update: केंद्र सरकारच्या अनेक सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे, पण तुम्हीही तुमचे पीपीएफ खाते उघडले असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आता मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. याबाबतची माहिती सरकारने (Government) दिली आहे. त्यामुळे तुमचे खाते उघडण्यापूर्वी तुम्हाला याची माहिती असणे आवश्यक आहे-

उत्तम व्याज मिळते

पीपीएफ ही एक प्रकारची कर बचत आणि उत्तम परताव्याची योजना आहे. या योजनेद्वारे तुम्हाला मॅच्युरिटीवर लाखोंचा लाभ मिळतो. PPF योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात आली होती. सध्या या योजनेचा लाभ 7.10 टक्के दराने मिळत आहे.

हे फायदे 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळतील

>> जेव्हा तुमचे पीपीएफ खाते मॅच्युअर होते, तेव्हा तुमच्याकडे पहिला पर्याय असतो तो म्हणजे खाते बंद करणे आणि संपूर्ण रक्कम काढणे.

>> तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुमचे खाते बंद न करणे आणि मॅच्युरिटीनंतर कोणत्याही नवीन ठेवीशिवाय 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदत वाढवणे.

>> मॅच्युअर पीपीएफ खात्यासह तुमच्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही नव्या ठेवींसह मुदत वाढवू शकता. पुन्हा कार्यकाळ 5 वर्षांच्या ब्लॉकसाठी वाढविला जाऊ शकतो.

महिन्यातून एकदा पैसे जमा केले जातात

तुम्ही PPF मध्ये किमान 1 वर्षात 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकता. जर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत PPF मध्ये 1 वर्षात जमा केले तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात दरमहा पैसे जमा करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT