PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकार देणार...!

Central Government Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा मिळणार आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PPF Scheme Latest Update: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. पीपीएफ योजना ही अशा योजनांपैकी एक आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवून मोठा फायदा मिळतो.

सरकारी योजनांमध्ये हमी परताव्यासह पैसे बुडण्याचा धोका नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा मिळणार आहे. या योजनेबाबत सरकारने एक मोठी अपडेट जारी केली आहे.

व्याजाचा लाभ किती होणार?

यावेळी, तुम्हाला या योजनेत 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अर्थ मंत्रालयाकडून दरवर्षी व्याजदर निश्चित केले जातात, जे 31 मार्च रोजी भरले जातात. म्हणजेच, यावेळी 31 मार्च रोजी सरकारकडून (Government) तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत.

Prime Minister Narendra Modi
PPF Calculator: पीपीएफबाबत अर्थमंत्री करणार मोठी घोषणा, 'या' खास ट्र‍िकने तुम्ही बनू शकता करोडपती!

500 रुपयांपासून सुरुवात करु शकता

या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करु शकते. त्याचवेळी, आर्थिक वर्षात, तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता. इतकंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधाही मिळते.

PPF वर कर सूट

तुम्हाला पीपीएफवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये मिळणारे व्याज आणि मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर मिळणारे पैसे हे तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत.

Prime Minister Narendra Modi
Budget Expectation: PPF खातेदारांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्री करणार 'ही' मोठी घोषणा!

आपण PPF मध्ये पैसे काढू शकतो का?

तुम्हाला PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक (Investment) करावी लागेल, परंतु जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्ही ते 6 वर्षानंतरच काढू शकता. PPF खात्यात आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, जी 7 व्या आर्थिक वर्षापासून घेतली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com