Tomato  Dainik Gomantak
अर्थविश्व

Tomato Price: केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा, 14 जुलैपासून मिळणार स्वस्त टोमॅटो

Central Government Plan to Sale Cheap Tomato: देशभरात टोमॅटोचे वाढलेले भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्यासाठी आता सरकारकडून टोमॅटो स्वस्त दरात विकले जाणार आहेत.

Manish Jadhav

Tomato Price Hike: देशभरात टोमॅटोचे वाढलेले भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्यासाठी आता सरकारकडून टोमॅटो स्वस्त दरात विकले जाणार आहेत.

केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे.

14 जुलैपासून टोमॅटो स्वस्तात विकले जाणार आहेत

दरम्यान, गेल्या महिनाभरात टोमॅटोचे (Tomato) दर झपाट्याने वाढले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना कमी दराने विकले जातील.

किलोमागे 200 रुपयांपर्यंत भाव वाढले

मुसळधार पावसामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे भाव 200 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करतील.

मंत्रालयाने माहिती दिली

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोचे वितरण केले जाईल. मंत्रालयाने सांगितले की, ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल.

जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी होते

जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय जुलैमध्ये पावसाळ्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढले आहेत.

टोमॅटो प्रामुख्याने हिमाचलमधून येतात

दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या राज्यात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आयात होते. याशिवाय टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT