7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 जुलैला मिळणार मोठी भेट, पगारात होणार बंपर वाढ

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना आनंदाचा आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता दिला जाणार आहे.
7th Pay Commission| Money
7th Pay Commission| Money Dainik Gomantak
Published on
Updated on

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना आनंदाचा आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता दिला जाणार आहे, हे या महिन्यात येणाऱ्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होईल.

मोदी सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. जुलै महिन्यात पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

जुलै महिन्याची आकडेवारी जाहीर केली जाईल

जुलै महिन्यासाठी AICPI निर्देशांकाची आकडेवारी ही महागाई भत्त्याची गणना ठरवण्यासाठी अंतिम डेटा असेल. त्याआधारे यावेळी कर्मचाऱ्यांचा (Employees) डीए 4 टक्क्यांनी वाढणार की आणखी वाढणार हे कळेल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार असेल.

7th Pay Commission| Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली थकबाकीची मोठी भेट, आता भरावा लागणार नाही कर!

सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घोषणा होऊ शकते

मार्च 2023 मध्ये सरकारने (Government) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती, जी जानेवारी 2023 पासून लागू झाली होती. त्याची पुढील पुनरावृत्ती जुलै 2023 मध्ये होणार आहे, परंतु असे मानले जाते की त्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केली जाऊ शकते.

4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे

यावेळीही सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. मे 2023 पर्यंत, AICPI निर्देशांकाचा आकडा 45.58 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या निर्देशांक 134.7 आहे. सध्या जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे.

महागाई भत्‍त्‍याचा आकडा राउंड फिगरमध्‍ये आहे. मे महिन्यासाठी निर्देशांकाचा आकडा 45.58 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो डीएमध्ये किमान 4 टक्क्यांनी वाढ होईल याची पुष्टी करतो.

7th Pay Commission| Money
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ!

46 टक्के डीए मिळू शकतो

जानेवारी ते जुलै या सहामाहीत सरकारने डीए आणि डीआरमध्ये 4 टक्के वाढ केली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 42 टक्के झाला होता. यावेळीही सरकारने 4 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 46 टक्के होईल.

7th Pay Commission| Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून मिळणार 'हे' दोन मोठे लाभ; पगारवाढीत होणार बंपर वाढ!

DA ही वेतन रचना आहे

डीए सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना आहे. देशभरातील महागाईचा दर लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. देशात ज्या दराने महागाई वाढत आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांचा डीए आणि पेन्शनधारकांचा डीआर वाढवला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com