casinos in Goa Daini Gomantak
अर्थविश्व

कॅसिनोवरील GST सह गोव्याची भीती वाढली; गुदिन्हो यांची CM सावंतांशी चर्चा, अर्थमंत्र्यांना लिहणार पत्र

गोव्याने यापूर्वी देखील कॅसिनोवरील करवाढीला विरोध दर्शवला होता.

Pramod Yadav

कॅसिनो, ऑनलाईन गेम्स आणि हॉर्स रेसिंग यावरील जीएसटी करात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी आकारण्यात येणारा 18 टक्के जीएसटी वाढून तो 28 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गोव्याने यापूर्वी देखील कॅसिनोवरील करवाढीला विरोध दर्शवला होता. पण, हा निर्णय झाल्यानंतर आता गोव्याने करवाढीचा राज्यातील पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत पत्र लिहण्याची मागणी केली आहे. कॅसिनोवरील दरवाढीचा राज्यातील पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. गोवा आणि सिक्कीम पर्यटकांना आकर्षित करणारी दोन महत्वाची राज्ये आहेत. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली आहे.

उत्तर प्रदेशने गोव्याच्या जीएसटी दर कमी ठेवण्याच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. मात्र, कॅसिनो गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून, अर्थमंत्री सितारमण यांच्याशी चर्चा करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली जाईल. असे माविन गुदिन्हो म्हणाले.

करवाढ ही समस्या नाही तर कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगच्या दर्शनी मूल्यावर 28 टक्के एकसमान दराने जीएसटी आकारला जाणार असल्याने तो अधिक असल्याचे म्हटले आहे.

डेल्डा कॉर्पला एका दिवसांत 1,500 कोटींचा तोटा

जीएसटी परिषदेत कर वाढीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीला एका दिवसांत तब्बल 1,500 कोटींचा तोटा झाला आहे. कंपनीचे शेअर्स 246 वरून 190 रूपयांवर आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT