BSNL 4G: बीएसएनएल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी BSNL च्या वतीने देशभरात 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी टाटा समूहाची तंत्रज्ञान कंपनी TCS च्या नेतृत्वाखालील संघाला 15,000 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे.
टीसीएसने (TCS) शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, टीसीएसच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 15,000 कोटी रुपयांहून अधिकची आगाऊ खरेदी ऑर्डर दिली आहे. हे देशभरात 4G नेटवर्क उभारण्याबाबत आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी 4G सेवा दमदार सुरू करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी दळणवळण राज्यमंत्री देवसिंह चौहान यांनी सांगितले होते की, सरकारने एक लाख बीएसएनएल 4G साइट्स उभारण्यास मंजुरी दिली आहे. कामाला सुरुवात झाली असून विविध ठिकाणांची ओळख पटली आहे. सरकार लवकरात लवकर 4G आणण्यासाठी काम करत आहे.
याची युजर्स खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या विलंबामागे अनेक कारणे दिली जात आहेत. BSNS च्या 4G नेटवर्कमध्ये पूर्णपणे स्वदेशी उपकरणे वापरली जातील. ही सेवा उशिरा येण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे.
BSNL 4G च्या माध्यमातून कंपनीचा मार्केट शेअर वाढेल का?
BSNL आपल्या 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. येत्या तीन वर्षांत बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी प्रवीण कुमार पुरवार यांनी सांगितले की, कंपनीने आपला बाजार हिस्सा 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.