Gurpatwant Singh Pannu Video| BSE |NSE| Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Bombay Stock Exchange बॉम्बने उडवण्याची धमकी, संशयाची सुई गुरपतवंत सिंग पन्नूकडे

Ashutosh Masgaunde

Gurpatwant Singh Pannu Threats:

अलीकडेच एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबईतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल पाठवण्यात आला होता. अतिसंवेदनशील ठिकाणी स्फोट घडवून आणले जातील, अशी धमकी या ईमेलमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.

सूत्रांनुसार, या धमकीच्या मेलमध्ये आरोपींनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसईमध्ये १२ मार्च रोजी स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख केला होता.

12 मार्च 1993 रोजी मुंबईत अनेक मालिका बॉम्बस्फोट झाले होते. त्याच दिवशी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्येही बॉम्बस्फोट झाला होता. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी खलिस्तानी चळवळीचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने अनेकांना रेकॉर्ड केलेले व्हॉईस कॉल केले होते.

या व्हॉईस कॉलमध्ये पन्नू म्हणाला, 'मी सिख फॉर जस्टिसचा जनरल काउंसिल आहे. तुम्ही लोक तुमचे पैसे भारतीय शेअर बाजारातून काढून घ्या आणि ते पैसे यूके आणि यूएस मार्केटमध्ये गुंतवा. यामुळे भारताचा कणा असलेला भारतीय शेअर बाजार कमकुवत होऊ शकतो.

सूत्रांचे म्हणणे आहे की, पन्नू पुढे म्हणाला की, 12 मार्चपर्यंत भारतीय बाजाराचे कंबरडे मोडले जाऊ शकते. तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीकडून अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना ईमेल पाठवण्यात आला होता. या मेलमध्ये बीएसईमध्ये स्फोट होईल, तोही १२ मार्चच्या दिवशी, असे म्हटले होते.

अशा स्थितीत संशयाची सुई आता पन्नूकडे जात आहे. ई-मेल हे पन्नूचे काम असावे असा संशय तपास यंत्रणांना आहे.

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा ईमेल प्रोटॉन ईमेल वापरून पाठवण्यात आला होता. प्रोटॉन ईमेलचे सर्व्हर परदेशात आहेत आणि आम्ही त्यांना पत्र लिहून हा ईमेल पाठवणाऱ्याची माहिती शेअर करण्यास सांगितले आहे.

परंतु प्रोटॉन ईमेल चालवणारी कंपनी गोपनीयतेचा हवाला देऊन कोणतीही माहिती सामायिक करत नाही. तथापि, तपास यंत्रणांनी ईमेलमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणाची पाडताळणी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT