भारताचे तुकडे करुन मुस्लिमांसाठी गुरपतवंत सिंग पन्नूला हवाय 'उर्दुस्तान' - NIA

Gurpatwant Singh Pannu: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
Gurpatwant Singh Pannu
Gurpatwant Singh PannuDainik Gomantak
Published on
Updated on

Gurpatwant Singh Pannu: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच, राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर मोठी कारवाई केली.

एनआयएने चंदीगड आणि अमृतसरमधील त्याची मालमत्ता जप्त केली. यासोबतच, एजन्सीने पन्नूवर तयार केलेल्या डॉजियरमध्ये खुलासा केला आहे की, त्याला भारताचे विभाजन करुन अनेक छोटे-छोटे देश निर्माण करायचे आहेत.

खलिस्तानची मागणी करणाऱ्या पन्नूचा काश्मीर वेगळा व्हावा आणि मुस्लिमांसाठी वेगळा देश असावा, असा हेतू आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या ऑडिओ मेसेजमध्ये अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोलतो आणि देशाच्या अखंडतेला आव्हान देतो.

विशेष म्हणजे, त्याने इंडिया गेटवर खलिस्तानी ध्वज फडकावणाऱ्याला अडीच लाख डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केले आहे.

दरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नूचे नाव 2019 पासून एनआयएच्या वाँटेड लिस्टमध्ये आहे. पंजाबसह (Punjab) देशातील अनेक भागात द्वेष पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

शिख फॉर जस्टिस या संघटनेच्या माध्यमातून पन्नू शीख तरुणांना कट्टरवादाकडे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. ही संघटना लोकांना स्वतंत्र खलिस्तान राष्ट्रासाठी लढण्यासाठी प्रवृत्त करते.

या संघटनेवर 2019 मध्येच भारत सरकारने बंदी घातली होती. गृह मंत्रालयाने पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी घोषित केले होते, परंतु इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली नव्हती.

Gurpatwant Singh Pannu
खलिस्तानी दहशतवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई, पंजाबमधील 2 मालमत्ता जप्त

दुसरीकडे, खलिस्तानवरुन कॅनडामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार गुरपतवंत सिंग पन्नूवर कारवाई करत आहे. कधी अमेरिकेत तर कधी कॅनडामध्ये धमक्या देणाऱ्या पन्नूच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, एनआयए कृती आराखडाही तयार करत असून त्यासाठी 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी बैठक घेणार आहे. त्यामुळे खलिस्तानवर कारवाईची तयारी होणार असल्याचे मानले जात आहे. कॅनडापासून भारतापर्यंत सक्रिय खलिस्तानी दहशतवाद्यांची (Terrorists) यादीही तयार केली जाईल.

Gurpatwant Singh Pannu
NIA Raid: गझवा-ए-हिंद मॉड्यूलबाबत एनआयएची मोठी कारवाई, तीन राज्यांत छापेमारी!

स्वतंत्र देशासाठी मुस्लिमांना चिथावणी, नावही सुचवले

पन्नूबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचा जन्म पाकिस्तानातील खानकोट येथे झाला. पन्नूचे आई-वडील आता या जगात नाहीत, तर भाऊ मगवंत सिंगही परदेशात राहतो.

पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेला पन्नू हा एक दहशतवादी असून त्याने अनेकदा हल्ल्यांचा प्लॅनही आखला आहे. शीखांव्यतिरिक्त, तो मुस्लिमांनाही वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यासाठी भडकावतो.

एवढेच नाही तर त्यासाठी 'डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ उर्दुस्तान' हे नावही सुचवतो. गुरपतवंत सिंगवर हिमाचल, पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com