Gold Loan News, BharatPe gold scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

BharatPe कडून व्यापाऱ्यांसाठी गोल्ड लोनची सेवा सुरू

भारतपे ने सुरक्षित कर्ज विभागामध्ये प्रवेश करून त्यांच्या व्यापारी भागीदारासाठी गोल्ड लोन कर्ज सेवा सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

फीनटेक फर्म भारतपे (BhartPe) ने त्यांच्या व्यापारी भागीदारांसाठी गोल्ड लोनची सेवा सुरू केली आहे. यासह कंपनीने सुरक्षित कर्ज विभागात प्रवेश केला आहे. भारतपेने व्यापाऱ्यांना 20 लाख रुपयापर्यंतचे सोने कर्ज देण्यासाठी नॉन- बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सोबत भागीदारी केली आहे. (BharatPe gold scheme Launch News)

ही कंपनी आपली नवी सेवा दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद येथील व्यापारी भागीदारांना आपली नवीन सेवा देत आहे. तथापि, कंपनीने या वर्षाच्या अखेरीस 20 शहरांमध्ये सेवा नेण्याचे आणि 500 कोटी रुपयांचे सोने वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

* व्याज दर वार्षिक 4.46 असेल

हे गोल्ड लोन (Gold Loan) दरमहा 0.39 टक्के किंवा वार्षिक 4.68 टक्के व्याजदराने प्रदान केले जाईल. कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल (Digital) आहे आणि कंपनीने अर्जाच्या फॉर्मचे मूल्यांकन करून 30 मिनिटांत कर्ज वितरित करण्याचा दावा केला आहे.

कंपनीने सांगितले आहे की पार्टनर व्यापारी भारतपे अॅपवर (App) उपलब्ध कर्ज पाहू शकतात आणि अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. हे कर्ज सहा महीने, नऊ महीने आणि 12 महिन्याच्या कालावधीत उपलब्ध आहे, कर्जाच्या परतफेडीसाठी लवकरच EMI पर्याय सुरू केला जाईल. भारतपेचे (BhartPe) सीइओ सुहेल समीर म्हणाले, " गोल्ड लोनसह, आम्ही सुरक्षित कर्ज श्रेणीत प्रवेश केला आहे. गोल्ड लोन आम्हाला आमच्या व्यापरी भागीदारांना अधिक सक्षम करण्यास आणि लाखो लहान व्यवसायांना मदत करण्यास सक्षम करेल. आम्ही प्रायोगिक तत्वावर 2 महिन्यासाठी हे सुरू केले आणि त्या दरम्यान आम्ही 10 कोटींचे कर्ज वितरित केले. या काळात मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT