रशियाची ऑफर स्वीकारल्यास भारताला मिळणार महागाईपासून दिलासा

रशियाने भारताला (India) स्वस्तात कच्चे तेल (Crude oil) आणि इतर वस्तू देण्याची ऑफर दिली
Crude oil, crude oil news
Crude oil, crude oil newsDainik Gomantak

रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) 20 दिवस झाले आहेत. मारिया पोल या दक्षिणेकडील शहरावर झालेल्या रशियन बॉम्बहल्ल्यात 2,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी सांगितले की, मारिया पोलमध्ये आमच्या सैन्याला यश मिळत आहे. आम्ही येथे रशियन सैन्याचा पराभव करून आमच्या युद्धकैद्यांना मुक्त केले आणि त्यामुळेच रशियन (Russia) सैन्य शहरात कहर करत आहे. त्याचवेळी दोन्ही देशांमधील संघर्षामुळे युरोपातील देशांना धोका वाढला आहे. निरपराध लोकांचा बळी जातो आहे. (Accepting Russias Crude oil offer will give India some relief from inflation)

Crude oil, crude oil news
किरकोळ महागाई कशी वाढते माहितीये का?

दुसरीकडे, काल पुन्हा एकदा युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की ते इस्रायलमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार आहेत. आतापर्यंत वीस लाखांहून अधिक युक्रेनियन निर्वासित युरोपीय देशांमध्ये पोहोचले आहेत. त्याच वेळी, तीन वेळा शांतता चर्चेनंतर, रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेची चौथी फेरीही काल सुरू झाली, जी आजही सुरू राहणार आहे. मात्र, आता युक्रेनची रशियाकडे वाटचाल कशी होईल अशी चर्चा सुरू आहे. (Crude oil news)

युद्धानंतर अर्थव्यवस्थेबद्दल सांगायचे झाले तर रशियाने भारताला (India) स्वस्तात कच्चे तेल (Crude oil) आणि इतर वस्तू देण्याची ऑफर दिली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तात असेही म्हटले आहे की भारत आता रशियाच्या ऑफरवर विचार करत आहे. रशियाने केवळ कच्चे तेल स्वस्तात देण्याची ऑफर दिली नाही तर इतर वस्तूही स्वस्तात देण्याची ऑफर रशियाने भारताला दिली आहे. त्याचे पेमेंटही डॉलरमध्ये नाही तर रुपयाचे रुबलमध्ये रूपांतर करून केले जाईल असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारताने रशियाचा प्रस्ताव मान्य केल्यास भारताला महागाईपासून मोठा दिलासा मिळू शकतो.

Crude oil, crude oil news
नेपाळच्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या भूमिका श्रेष्ठांनी स्विकारला इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार

मात्र, ज्या प्रकारे पाश्चात्य देश आणि अमेरिकेची रशियाबद्दल कठोर भूमिका आहे, त्यामुळे भारताला हा प्रस्ताव मान्य करणे अडचणीचे होऊ शकते. रशियावरील निर्बंधही सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत रशियावर बंदी आल्यानंतरही भारताला ही ऑफर स्वीकारणे शक्य आहे का? कारण अनेक देश रशियाशी व्यापार करण्यास कचरतात? भारताने रशियाची ऑफर स्वीकारली तर भारताला किती मोठा फायदा होऊ शकतो. मात्र याचे परिणाम काय होईल हे अद्याप सांगता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com