भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BE) ने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गाझियाबाद युनिट भारत एंटरप्राइझसाठी प्रशिकणार्थ इंजिनियर-Iआणि प्रोजेक्ट इंजिनियर-I च्या एकूण 63 पदांच्या भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार 6 एप्रिल 2022 पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. (BEL Recruitment 2022 Notification)
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडने या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून BE/B.Tech/B.sc इंजिनियरिंगची (Engineer) पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
* कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त
ट्रेनी इंजीनियर –I: 26
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग - 16
मेकॅनिकल इंजीनियरिंग- 03
सिविल इंजीनियरिंग -07
प्रोजेक्ट इंजीनियर –I: 37
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग- 07
कंप्यूटर सायन्स इंजीनियरिंग-26
मेकॅनिकल इंजीनियरिंग- 01
सिविल इंजीनियरिंग- 02
शैक्षणिक पात्रता काय असावी
* ट्रेनी इंजीनियर-I आणि प्रोजेक्ट इंजीनियर
या पदासाठी उमेदवाराने BE/B.Tech/B.SC इंजिनियरची पदवी प्राप्त केली असावी. सामान्य / EWS / OBC कॅटेगरीमधील उमेदवारांना 55% किंवा अधिक गुणांसह इंजिनियरची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच SC / ST / PwBD उमेदवारांकडे 55% पेक्षा कमी गुणांसह अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
* अर्ज शुल्क किती
* ट्रेनी इंजिनियर
सामान्य / ओबीसी कॅटेगरीमधील उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील तर SC/ST उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली गेली आहे.
* प्रोजेक्ट इंजिनियर
सामान्य / ओबीसी कॅटेगरीमधील उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील. तर SC/ST उमेदवारांना अर्ज शुल्कात दिली गेली आहे.
* या पदांसाठी किती वय मर्यादा असावी
* ट्रेनी इंजिनियर
सामान्य कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी 32 वर्षे वय पूर्ण झालेले असावे. तर SC/ST कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट देण्यात आली आहे.
* प्रोजेक्ट इंजिनियर
सामान्य कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे वय देण्यात आली आहे. तर SC/ST कॅटेगरीमधील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे आहे.
* या पदांसाठी कसा करावा अर्ज
इच्छुक उमेदवार 6 एप्रिल 2022 पूर्वी अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जावून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.