Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank MCLR Rates: 'या' सरकारी बँकांमध्ये खाते असणाऱ्यांना मोठा झटका, उद्यापासून...

Bank EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने काल (गुरुवारी) धोरणात्मक दरांबाबत मोठा निर्णय घेतला, आणि आज अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली.

Manish Jadhav

Bank EMI: भारतीय रिझर्व्ह बँकेने काल (गुरुवारी) धोरणात्मक दरांबाबत मोठा निर्णय घेतला, आणि आज अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे.

तुमचेही यापैकी कोणत्याही बँकेत खाते असल्यास तुमचा EMI वाढणार आहे. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी MCLR दर वाढवले ​​आहेत, यामुळे या बँकांमध्ये खाते असलेल्या ग्राहकांचा EMI वाढेल.

आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही

दरम्यान, या बँकांनी व्याजदरात 10 बेसिस पॉंइंटची वाढ केली आहे. त्याचवेळी, यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. व्याजदर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयने (RBI) व्याजदरात वाढ न केल्यावरही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत.

उद्यापासून नवीन दर लागू होतील

बँकांच्या या निर्णयामुळे MCLR शी जोडलेला मासिक हप्ता (EMI) वाढेल. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) शेअर बाजाराला कळवले की, एक वर्षाचा MCLR 8.70 टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी, पूर्वी हा दर 8.65 टक्के होता. नवीन दर 12 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचे BoB ने सांगितले आहे.

कॅनरा बँकेनेही व्याजदर वाढवला ​

याशिवाय, कॅनरा बँकेनेही MCLR दर वाढवला ​​आहे. कॅनरा बँकेने व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यानंतर कॅनरा बँकेचा व्याजदर 8.7 टक्के झाला आहे. कॅनरा बँकेचे दरही 12 ऑगस्टपासून लागू होतील.

बँक ऑफ महाराष्ट्रने देखील व्याजदरात वाढ केली

बँक ऑफ महाराष्ट्रने देखील MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे. बीओएमनेही याबाबत शेअर बाजाराला याबाबत कळवले. यासह, बॅंकेचा एक वर्षाचा MCLR 8.50 टक्क्यांवरुन 8.60 टक्के झाला. सुधारित दर 10 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT