Bank MCLR Rates: बँकेकडून कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का बसला आहे. तुम्ही देखील कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर आता तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने MCLR चे दर वाढवले आहेत. त्याचबरोबर स्टेट बँकेने कर्जासह ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे.
रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच रेपो दरात वाढ केली आहे. RBI ने 8 फेब्रुवारी रोजी पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर ग्राहकांच्या कर्जाचा EMI देखील वाढला आहे.
बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) सर्व कालावधीसाठी MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचे नवीन दर 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एका वर्षासाठी MCLR 8.5 टक्क्यांवरुन 8.55 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.3 टक्के असेल.
याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. या वाढीसह, एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 8.30 टक्क्यांवरुन 8.45 टक्के करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.35 टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी, एक दिवस, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR च्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या अंतर्गत, एक दिवस आणि तीन वर्षांच्या कर्जावरील MCLR आधारित व्याज 7.95 टक्के ते 8.70 टक्के असेल. नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेनेही ठेवींच्या दरात 0.05 टक्क्यांनी वाढ करुन 0.25 टक्के केली आहे.
सुधारित दरानुसार ज्येष्ठ नागरिकांना आता पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचवेळी, इतरांना तीन वर्षांच्या ठेवींवर 0.05 टक्के अधिक व्याज मिळेल. दीर्घ मुदतीच्या ठेवींवर आता 0.25 टक्के व्याज मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.