Bajaj Auto will lauch CNG Bike: बजाज ऑटो सीएनजी इंधनावर चालणारी एंट्री-लेव्हल मोटरसायकल लॉन्च करू शकते. कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, जर बजाजने ही बाईक आणली तर पूर्णत: सीएनजी मोटरसायकल बनवणारी ती भारतातील पहिली कंपनी ठरेल.
सीएनजी मोटारसायकल खरेदी आणि इंधन या दोन्ही बाबतीत स्वस्त असतील. ज्यांना वाढते पेट्रोल दर परवडत नाहीत, त्यांच्यासाठी या बाईक्स आकर्षक ठरतील.
राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईकमधील सुरक्षा, रेंज, चार्जिंग आणि बॅटरी लाइफ याबाबत उत्पादकांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. अशा बाइक्स ग्राहकांसाठीही खूप चांगल्या असतील. यामुळे इंधनाचा खर्च 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
राजीव बजाज म्हणाले की, येत्या सणासुदीच्या काळात एंट्री-लेव्हल इंटर्नल कम्बशन इंजिन बाइक्सच्या (100cc) विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा नाही. याचे कारण म्हणजे खरेदीदार इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळत आहेत.
पिरॅमिडच्या तळाशी असलेले खरेदीदार ज्यांना कोविडचा फटका बसला आहे, नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती त्यांना परवडत नाहीत.
बजाज ऑटोचे 100cc आणि 125cc मधील एंट्री सेगमेंटमध्ये सात मोटरसायकल मॉडेल्स आहेत. कंपनी 100cc विभागात दोन मॉडेल ऑफर करते - बजाज प्लॅटिना आणि बजाज सीटी 100. तथापि, या श्रेणीत कंपनी आघाडीवर नाही.
सीएनजी थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे 70 टक्के आहे. त्याच वेळी, बजाजने या आर्थिक वर्षात पल्सर मोटरसायकलचे सहा नवीन अपग्रेड आणि आजपर्यंतची सर्वात शक्तिशाली पल्सर लॉन्च करण्याविषयी देखील सुतोवाच केले आहे. सध्या 250cc ही पल्सरची सर्वात शक्तिशाली बाईक आहे.
बजाज यांनी सांगितले की, कंपनी ट्रायम्फ मोटरसायकल आणि चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन देखील वाढवत आहे. ट्रायम्फ उत्पादन सध्या सुमारे 8,000 युनिट्सवरून दरमहा 15,000 ते 20,000 युनिट्सपर्यंत वाढवले जाईल.
सणासुदीच्या काळात चेतकचे उत्पादन दर महिन्याला 10,000 युनिट्स आणि वर्षाच्या अखेरीस सुमारे 20,000 युनिट्सपर्यंत पोहोचेल. कंपनी ऑक्टोबरमध्ये ट्रायम्फ मोटारसायकलींची निर्यात सुरू करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.