Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

Atal Pension Yojana: विवाहितांना मिळणार मासिक 10000 पेन्शन! लवकरात लवकर घ्या लाभ

Atal Pension Yojana Rules: भविष्य लक्षात घेऊन पेन्शनचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Atal Pension Yojana New Rules: भविष्य लक्षात घेऊन पेन्शनचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अनेक सरकारी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. सरकारच्या अशाच एका योजनेचे नाव आहे, 'अटल पेन्शन योजना'. गेल्या काही दिवसांत या प्लॅनमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. या योजनेत पती-पत्नी दोघांच्या नावे स्वतंत्र खाते उघडून दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते.

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना ही सरकारी योजना आहे. यामध्ये तुमची गुंतवणूक आणि तुमच्या वयानुसार तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे ठरवले जाते? योजनेंतर्गत, तुम्हाला किमान 1000 रुपये आणि कमाल 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. यामध्ये तुम्हाला 2000 रुपये, 3000 रुपये आणि 4000 रुपये पेन्शन देखील मिळू शकते. ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक (Investment) आहे.

कोण गुंतवणूक करु शकते?

नवीन बदलांतर्गत, वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करुन म्हटले की, आयकर कायद्यांतर्गत प्राप्तिकरदाते असलेली कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करु शकत नाही. जर एखाद्या करदात्याने 1 ऑक्टोबर नंतर अटल पेन्शन (Pension) योजनेसाठी खाते उघडले तर त्याचे खाते निदर्शनास आल्यानंतर लगेच बंद केले जाईल. तसेच, तोपर्यंत जमा केलेले पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

हा नवीन नियम आहे

नवीन बदलांतर्गत, वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करुन म्हटले की, आयकर कायद्यांतर्गत प्राप्तिकरदाते असलेली कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करु शकत नाही. जर एखाद्या करदात्याने 1 ऑक्टोबर नंतर अटल पेन्शन योजनेसाठी खाते उघडले तर त्याचे खाते निदर्शनास आल्यानंतर लगेच बंद केले जाईल. तसेच, तोपर्यंत जमा केलेले पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

योजनेचे फायदे

या योजनेंतर्गत 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती नामांकन करु शकतात.

यासाठी अर्जदाराचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.

तुम्ही या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल.

जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली तर त्याला 60 वर्षानंतर दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील.

10,000 रुपये पेन्शन कसे मिळवायचे

39 वर्षांखालील जोडीदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

जर पती-पत्नीचे वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ते दरमहा 577 रुपये एपीवाय खात्यात जमा करु शकतात.

जर पती-पत्नीचे वय 35 वर्षे असेल, तर त्यांना दरमहा 902 रुपये त्यांच्या APY खात्यात टाकावे लागतील.

गॅरंटीड मासिक पेन्शन व्यतिरिक्त, जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास, हयात असलेल्या जोडीदाराला प्रत्येक महिन्याला पूर्ण आयुष्य पेन्शनसह 8.5 लाख रुपये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT