Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

BSNL ग्राहकांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा, केंद्रीय मंत्री म्हणाले...

BSNL To Roll Out 5G: तुम्हीही BSNL चे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. करोडो ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

Manish Jadhav

BSNL To Roll Out 5G: तुम्हीही BSNL चे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. करोडो ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

भारत सरकार 25000 मोबाईल टॉवर लवकरात लवकर बसवण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नवीन टॉवर उभारण्यासाठी सरकारने (Government) 36,000 कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.

कनेक्टिव्हिटीबाबत चिंता व्यक्त केली

नुकतेच पंतप्रधान मोदींनी 5G सेवा लॉन्च केली. केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी राज्यांच्या आयटी मंत्र्यांची बैठक घेतली. यादरम्यान सर्व राज्यांच्या आयटी मंत्र्यांनी कनेक्टिव्हिटी हे आव्हान असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.

यावर अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'जोपर्यंत कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्यांना हेवी लिफ्टिंग करावे लागेल.'

सर्व राज्य सरकारांचे कौतुक केले

पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनमध्ये सामील झाल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी सर्व राज्य सरकारांचे कौतुक केले. एकत्र काम केल्याने चांगले परिणाम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे पुनरुज्जीवन केल्याने कनेक्टिव्हिटीची समस्या बर्‍याच प्रमाणात सोडवली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले.

ते म्हणाले की, 'बीएसएनएलच्या (BSNL) पुनरुज्जीवनासाठी आमच्याकडे 1.64 लाख कोटी रुपये आहेत, जे त्यांच्या भांडवली गुंतवणुकीची गरज आणि तंत्रज्ञान अपग्रेडेशन पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत.'

अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे

याआधी, केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली होती की, येत्या काळात देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. इंडिया मोबाईल काँग्रेसनंतर लगेचच त्यांनी ही घोषणा केली. अश्विनी वैष्णव यांच्या वक्तव्यानंतर येत्या ऑगस्टपर्यंत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये BSNL ची 5G सेवा उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची ज्योत ठेवली तेवत...

पर्यटन हंगामात निवडणुका म्हणजे अर्थकारणावर घाला! निवडणूक पुढे ढकलण्यासाठी 'टीटीएजी'चे मुख्यमंत्र्यांना पत्र

Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

Goa Accident: भाच्याला घरी सोडताना मामावर काळाचा घाला; शिवोलीत रेंट-अ-थारचा थरार, स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Today: ज्येष्ठ पूर्णिमा व्रताला बनतोय अत्यंत दुर्मिळ योग; शनिवारी 'या' राशींच्या पदरात पडणार सुखाचे क्षण, नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ संकेत!

SCROLL FOR NEXT