BSNL च्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, 5G सेवा होणार उपलब्ध?

Ashwini Vaishnaw: Jio आणि Airtel सारख्या दिग्गज खाजगी दूरसंचार कंपन्यांनी देशातील विविध मंडळांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. दोन्ही कंपन्यांनी नवीन वर्षात देशभरात 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
BSNL
BSNLDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Telecom Industry: Jio आणि Airtel सारख्या दिग्गज खाजगी दूरसंचार कंपन्यांनी देशातील विविध मंडळांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. दोन्ही कंपन्यांनी नवीन वर्षात देशभरात 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, काही लोकांना 4G पेक्षा 5G रिचार्ज महाग होईल, अशी भीती वाटत आहे. पण आता यावर टेलिकॉम कंपन्यांकडून सांगण्यात आले की, दोन्हीची किंमत जवळपास सारखीच असेल. दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारी मालकीच्या BSNL ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे.

1.35 लाख टॉवरमध्ये 5G तंत्रज्ञान सुरु होईल

येत्या 5-7 महिन्यांत 4G आधारित तंत्रज्ञान 5G वर अपडेट केले जाईल, असे दूरसंचार मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, बीएसएनएलच्या देशभरातील 1.35 लाख टॉवर्समध्ये 5जी सुरु होणार आहे. उद्योग संस्था CII (CII) च्या एका कार्यक्रमात वैष्णव म्हणाले की, देशाच्या नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (TTDF) वार्षिक 500 कोटींवरुन 4,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकारची (Government) योजना आहे.

BSNL
BSNL बाबत सरकारची मोठी घोषणा! या दिवशी होणार कंपनीचे विलीनीकरण; PM मोदींनी दिली मंजूरी

दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल मजबूत स्थितीत असेल

कोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी दूरसंचार उद्योगातील बीएसएनएलच्या (BSNL) भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर वैष्णव म्हणाले की, 'दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल मजबूत स्थितीत असेल.' ते पुढे म्हणाले की, 'बीएसएनएलचे देशभरात सुमारे 1.35 लाख मोबाइल टॉवर आहेत.'

याशिवाय, कंपनीचे ग्रामीण भागात मजबूत नेटवर्क आहे. अनेक क्षेत्रांमध्ये इतर दूरसंचार कंपन्या अद्याप पोहोचू शकलेल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com