Air India  Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

Air India Ticket Price Hike April 2026: टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी 'एअर इंडिया'ने प्रवाशांना मोठा झटका दिला.

Manish Jadhav

Air India Ticket Price Hike April 2026 : टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी 'एअर इंडिया'ने प्रवाशांना मोठा झटका दिला. जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने आपल्या 'फ्यूल सरचार्ज' रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून याचे नवे दर उद्या, 8 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही मार्गावरील विमान तिकिटांच्या किमतीत वाढ होणार असून सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

7 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात एअर इंडियाने स्पष्ट केले की, जेट इंधनाच्या किमतीत झालेली ऐतिहासिक वाढ पेलणे आता अशक्य झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. 27 मार्च 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर जेट इंधनाची सरासरी किंमत प्रति बॅरल 195.19 डॉलर्सवर पोहोचली आहे, जी फेब्रुवारीच्या अखेरीस केवळ 99.40 डॉलर्स होती. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात इंधनाच्या दरात जवळपास 100 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. कच्चे तेल महागणे आणि रिफायनरी मार्जिनमध्ये झालेली वाढ ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

नव्या नियमांनुसार, एअर इंडियाने (Air India) आता 'फ्लॅट रेट' ऐवजी प्रवासाच्या अंतरावर आधारित इंधन अधिभार लागू केला. कमी अंतराच्या प्रवासापेक्षा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, 500 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी 299 रुपये अधिभार लागेल, तर 2,000 किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 899 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. 1000 ते 1500 किमी दरम्यानच्या प्रवासासाठी हा दर 549 रुपये निश्चित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांवरही अशाच प्रकारे दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, तिथेही तिकिटे महागणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

केंद्र सरकारने एटीएफच्या किमतीत जास्तीत जास्त 25 टक्क्यांपर्यंत वाढीची मर्यादा निश्चित केल्यानंतर एअर इंडियाने ही नवी दरवाढ जाहीर केली. विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा जवळपास 40 ते 50 टक्के असतो. त्यामुळे इंधनाचे दर दुप्पट झाल्याचा थेट परिणाम आता प्रवाशांच्या भाड्यावर दिसून येणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण प्रवासाचे नियोजन करत असतानाच एअर इंडियाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. इतर विमान कंपन्याही आता एअर इंडियाच्या पावलावर पाऊल ठेवून दरवाढ करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT