Air India New Logo Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India New Logo: एअर इंडियाने लॉन्च केला नवीन लोगो, डिसेंबर 2023 पासून एअरलाइन...

Manish Jadhav

Air India New Logo Update: टाटा समूहाची एअरलाइन बनलेल्या एअर इंडियाने आपला नवा लोगो लॉन्च केला आहे. एअर इंडिया आता नवीन लोगो, ब्रँड आणि ओळखीसह दिसणार आहे. कंपनी गेल्या 15 महिन्यांपासून नवीन लोगोवर काम करत होती.

एअर इंडियाचा नवीन लोगो द व्हिस्टा गोल्ड विंडो फ्रेमवरुन प्रेरित आहे, जो एअरलाइनच्या अमर्याद संभावना, प्रगतीशील आणि भविष्याबाबतचा आत्मविश्वासपूर्ण दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो, असे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, नवीन लोगो लॉन्च करताना टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, आज आम्ही एअर इंडियाला एका नवीन व्हिजनसह सादर करत आहोत. ते पुढे म्हणाले की, नवीन लोगो अमर्याद संभावनांचे प्रतीक आहे.

एअरलाइनच्या सर्व कर्मचाऱ्यांना (Employees) अपग्रेड केले जात आहे. एअर इंडिया आपल्या विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्यावर काम करत आहे, जेणेकरुन ते जागतिक दर्जाचे बनवता येतील.

एअर इंडियाचा (Air India) नवीन लोगो ऐतिहासिकदृष्ट्या भारतात वापरल्या जाणाऱ्या खिडकीशी मिळता-जुळता आहे. हे 'संधीच्या खिडकी'चे प्रतीक असल्याचे एअरलाइनचे मत आहे.

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, नवीन ब्रँड जगभरातील अतिथींना सेवा देणारी जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याची एअर इंडियाची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.

नवीन लोगो फ्युचरब्रँडच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या प्रवाशांना डिसेंबर 2023 पासून विमानांवर नवीन लोगो दिसेल, जेव्हा एअर इंडियाचे पहिले Airbus A350 नवीन लोगोसह त्यांच्या ताफ्यात सामील होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT