Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: या राज्यासाठी अदानी समूह खर्च करणार 1 लाख कोटी, बनवली खास योजना

Adani Group News: अदानी समूह येत्या 7 वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Adani Group News: अदानी समूह येत्या 7 वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक कर्नाटकात केली जाणार आहे. अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करण गौतम अदानी यांनी ही माहिती दिली आहे.

करण गौतम अडानी यांनी माहिती दिली

करण अदानी म्हणाले की, “कर्नाटकमध्ये (Karnataka) आम्ही ज्या क्षेत्रात गुंतवणूक आणि विस्तार करणार आहोत, त्यामध्ये पुढील सात वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी असल्याने अदानी समूह राज्यात अक्षय ऊर्जेमध्ये अधिक गुंतवणूक करणार आहे.''

तसेच, करण अदानी यांनी पुढे सांगितले की, 'आदानी समूह कर्नाटकमध्ये सिमेंट, ऊर्जा, पाइप गॅस, खाद्यतेल, वाहतूक, लॉजिस्टिक आणि डिजिटल (Digital) अशा अनेक क्षेत्रात सक्रिय आहे. आतापर्यंत 20,000 कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे.'

सिमेंट व्यवसायावर अदानींचे लक्ष

गौतम अदानी हे गेल्या काही दिवसांत केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील आघाडीचे उद्योगपती म्हणून उदयास आले आहेत. सध्या, अदानी समूहाचे कर्नाटकात 7 दशलक्ष टनांहून अधिक क्षमतेचे चार सिमेंट कारखाने आहेत. करण अदानी यांनी सांगितले की, 'समूह या क्षेत्रातही आपली ताकद वाढवेल. याशिवाय मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही (Airport) विस्तार करण्यात येणार आहे. अदानी विल्मार मंगळुरुमध्ये आपली ताकद वाढवत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

Shappora River Water: शापोरा नदीचे पाणी आता थेट अस्नोड्यापर्यंत! साळ बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा बंद; दररोज २५ कोटी लिटर पाणी उचलणार

SCROLL FOR NEXT