Gautam Adani पुढील दहा वर्षात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

उर्जा क्षेत्रात गौतम अदानी गुंतवणूक करणार
Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak

गौतम अदानी (Gautam Adani) हे दिग्गज भारतीय उद्योगपती असून, जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी ऊर्जा क्षेत्रात (Energy) येत्या 10 वर्षांत 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. अदानी समूह पुढील दशकात अक्षय आणि पर्यायी ऊर्जा व्यवसायात 100 अब्ज गुंतवणूक करणार आहे. अशी माहिती फोर्ब्स ग्लोबल सीईओ परिषदेत मंगळवारी देण्यात आली. ऊर्जा ट्रान्समिशन स्पेससाठी एक मोठी गुंतवणूक योजना तयार केली असल्याचे अदानी म्हणाले.

गौतम अदानी म्हणाले, अदानी समूह पुढील दशकात ऊर्जा क्षेत्रात 100 अब्ज रूपयांची गुंतवणूक करणार आहे. 70 टक्के रक्कम ऊर्जा क्षेत्राच्या जागेसाठी वापर केला जाईल. आम्ही 20 GW क्षमतेसह जगात सर्वात मोठी सौर कंपनी आहोत. या दिशेने आम्हाला पुढे जायचे आहे. कंपनी हायड्रोजन व्हॅल्यू चेनमध्ये 70 अब्ज गुंतवणूक करणार आहे.

Gautam Adani
Goa Accident : पुण्यातून गोव्यात येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

नवीन व्यवसायात सौरऊर्जेच्या माध्यमातून 45 GW क्षमतेची वाढ होणार असल्याचे गौतम अदानी यांनी म्हटले आहे. गौतम म्हणाले की, सुमारे 100,000 हेक्टरमध्ये हायब्रीड अक्षय ऊर्जा निर्मिती विकसित केली जात आहे जी सिंगापूरपेक्षा 1.4 पट जास्त आहे.

गौतम अदानी यांनी मंगळवारी सांगितले की आम्ही 10 GW ची सिलिकॉन आधारित फोटो व्होल्टेइक व्हॅल्यू चेन तयार करण्याचे काम करत आहोत. कच्च्या सिलिकॉनपासून ते सोलर पॅनल्सपर्यंत सर्व काही यामध्ये निर्माण केले जाईल. त्याचप्रमाणे, टर्बाइन निर्मितीचा 10 GW, तर 5 GW क्षमतेचा हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर कारखाना देखील उभारला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com