Aadhaar Card
Aadhaar Card  Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar Card Update: आधार धारकांसाठी महत्त्वाची बातमी! आधार अपडेटसाठी 'ही' नवी सेवा सुरू, UIDAI ने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

Aadhaar Card Update: देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने सांगितलं की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट फ्रि मध्ये केले जाणार आहे.

पण, यासाठी एक अट आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केले तर त्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागतील. 

केव्हा उपलब्ध होणार सुविधा? 

UIDAI ने सांगितले की आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येईल. आधार कार्ड धारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत त्यांचे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात.

31 मार्चपर्यंत पॅन, आधार लिंक करणे अनिवार्य 

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. यासोबतच ज्या नागरिकांनी 10 वर्षांपासून आधारमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे, यासाठी UIDAI अधिकृत ट्विटर अकाउंवर माहिती शेअर केली आहे.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी काय कराल? 

आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ या लॉग इन करु शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.

यानंतर तुम्हाला 'Document Update' वर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची माहिती दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमची अपडेटेड माहिती भरावी लागेल. 

आधार पत्ता ऑनलाईन अपडेट करण्यासाठी काय करावे

https://myaadhaar.uidai.gov.in/ या साइटवर तुम्ही स्वत: अपडेट करु शकता. आधार स्वयं-सेवा (Self Service) अपडेट पोर्टलवर जा आणि 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' (proceed to update address) पर्यायावर क्लिक करा.
 

आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरुन Log In करा.
 

 'proceed to update address ' वर क्लिक करा.
 

12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा.
 

OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉगिन करा.
 

'update address via address proof' पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता भरा. 

 'Proof of Address' मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता भरा.
 

 आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून Submit बटणावर क्लिक करा.
 

पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT